बुद्ध धम्म हा मानवी मूल्यांचे जतन करण्याचा संदेश देणारा जगातील सर्वश्रेष्ठ धम्म - सीईओ वर्षा ठाकूर -NNL

एकनिष्ठ प्रतिष्ठानच्या बुद्ध प्रभात कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद


नांदेड|
तथागत गौतम बुद्धांनी दिलेला बौद्ध धर्म हा मानवी मूल्यांचे जतन करण्याचा संदेश देणारा जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ धम्म असल्याचे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले आहे.

मागील तेरा वर्षापासून नांदेड येथील एकनिष्ठ प्रतिष्ठानच्यावतीने पत्रकार विजय निलंगेकर यांच्या पुढाकाराने बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने बुद्ध प्रभात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. नांदेड येथील युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातल्या दिग्गज भिमशाहिरांनी हजेरी लावली आहे. तथागत गौतम बुद्धांच्या जयंतीदिनी बुद्ध पौर्णिमेला पहाटे सहा पासून या बुद्ध प्रभात कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. नांदेड शहरासह जिल्हाभरातून बुद्ध प्रेमी प्रेक्षक या कार्यक्रमाला हजेरी लावतात. तब्बल दोन वर्षाच्या कोरोणा कालखंडानंतर या वर्षी हा कार्यक्रम घेण्यात आला. 

नांदेड येथील भिमशाहिर अंकुश चित्ते आणि त्यांच्या संचाने एकाहून एक सुंदर कर्णमधुर भीम गीतांचा नजराणा प्रेक्षकांसमोर ठेवला तर पत्रकार विजय निलंगेकर यांनी गायलेल्या अनेक भीम व बुद्ध गीतामुळे या कार्यक्रमाला बहर आला. तथागतांना वंदन करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रथम नमो गौतमा या गीतापासून .. ओ बात करो पैदा.. या गीता पर्यंत अनेक भरदार व प्रेरणादायी गीतांचे सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमाला भीम प्रेमी, बुद्ध प्रेमी नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. अगदी पहाटे सुरू झालेल्या या कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी हजेरी लावली. 

यावेळी संयोजन समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देताना वर्षा ठाकूर यांनी जगाला हेवा वाटावा असा बुद्ध धम्म असून , मानवी मूल्यांचे जतन करणारा समतेचा व समानतेचा संदेश देणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव धर्म असल्याचे त्या म्हणाल्या. बुद्ध माणसाला माणसासारखे वागण्याचा संदेश देतात. त्याचबरोबर विज्ञानवाद शिकवतात आणि प्रेमाचा संदेश देऊन जग केवळ शांततेच्या विचारावर तारू शकते, युद्धाने कोणाचेही भले होणार नाही मात्र प्रेमाने जग जिंकता येते. हा संदेश केवळ आणि केवळ बुद्ध धम्मात तथागतांनी सांगितला आहे असे त्या म्हणाल्या. जग प्रगतीच्या दिशेने झपाट्याने जात असताना मानवी मूल्यांची हेटाळणी होत आहे. 

माणूस माणसावर प्रेम करायला विसरत चाललेला आहे. द्वेषाने प्रेमा वर मात करण्याचा चंग बांधला आहे. अशात बुद्धाच्या विचारांची पेरणी होणे आवश्यक आहे. जयंतीदिनी आपण तथागत बुद्धांच्या शांततेच्या विचारांची पेरणी करून जगाला प्रेमाचा व शांतीचा संदेश देऊया. हेच तथागत गौतम बुद्ध यांना वंदन असेल. अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला भीमशक्तीचे नेते तथा नगरसेवक प्रतिनिधी सुरेश हटकर, कामगार नेते गणेश शिंगे, सम्राट प्रिंटरचे अशोक भोरगे, जिल्हा नेहरू युवा केंद्राच्या समन्वयक चंदा रावळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे हे होते. 

अंकुश चित्ते व संचाने गायलेल्या बहारदार प्रबोधन भीम गीतांनी परिसर दणाणून गेला होता तर पत्रकार विजय लंकर यांनी अनेक भीम गीता बरोबर ओ बात करो पैदा... हे प्रसिद्ध गीत गाऊन प्रसिद्ध भिमशाहिर प्रकाशनाथ पाटणकर यांच्या आठवणी जाग्या केल्या. दमदार आवाजात गायलेल्या या गीताने प्रेक्षकांच्या मनाला साद घातली. अगदी जल्लोषात विजय निलंगेकर यांनी गायलेल्या या ऐतिहासिक गीताने चैतन्यमय वातावरण निर्माण केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य संयोजक निहाल निलंगेकर यांच्यासह संजय समितीचे अध्यक्ष संपादक श्याम कांबळे, पत्रकार कुंवरचंद मंडले, दीपंकर बावस्कर, संपादक सुनील कांबळे, गंगाधर झिंजाडे, बुद्धभूषण रायबोले, अनिरुद्ध निखाते, सुशील हटकर, प्रसाद सूर्यवंशी, शुभम जेठे, ऋषिकेश निलंगेकर आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी