नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा अधिकारी पदावर भाषा वाङ्मय संकुलातील प्राध्यापक डॉ. पृथ्वीराज तौर यांची नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र राजभाषा अधिनियमातील तरतूदी प्रमाणे मराठी भाषा विषयक कार्ये पार पाडण्यासाठी मराठी भाषा अधिकारी हे पद निर्माण करण्यात आले आहे. मराठी भाषा जतन, प्रसार, प्रचार व संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन मराठी भाषा अधिकारी करतील. ‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या मराठी भाषा अधिकारी पदी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी डॉ. पृथ्वीराज तौर यांची नेमणूक केली आहे.
डॉ. पृथ्वीराज तौर हे मागील आठरा वर्षांपासून विद्यापीठात मराठी विभागात कार्यरत आहेत. कवी, समीक्षक आणि अनुवादक म्हणून त्यांची ओळख असून डॉ. तौर यांची एकूण चोविस पुस्तके प्रकाशित आहेत. डॉ. पृथ्वीराज तौर हे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्यही आहेत.
डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या या नियुक्तीबद्दल विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. वैजयंता पाटील, भाषा संकुलाच्या संचालिका डॉ. शैलजा वाडीकर, ललित व प्रयोगजिवी संकुलाचे संचालक डॉ. पी. विठ्ठल, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, शिक्षणशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. चंद्रकांत बाविस्कर यांनी अभिनंदन केले आहे.