अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन खातेदाराला बँकेतुन हाकलुन दिले ....
हदगाव, शे.चांदपाशा| मी तुझ्या बापाचा नौकर नाही अश्या मुजोरी भाषेत महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या एका कर्मचाऱ्यांने अर्वाच्या भाषेत खातेदाराला शिवीगाळ करित होता. असा आरोप अक्षय रमेश पवार (रा बामणी ता. हदगाव जि नादेड ) यांनी हदगांव पोलिस स्टेशनला दि ९ मेला दिलेल्या तक्रारीत केला आहे.
त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी हदगांव शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत माझ्या बँकेतील खात्याच्या कामा संबधी गेलो असता तेथील काँटरवर असलेले बँक कर्मचारी धबाले नावाचे हे बँकेतील दुस-या खातेदाराशी वाद घालत होते. मी बराच वेळ त्यांचा वाद पाहत होतो. मी पण लाईन मध्ये थांबल्याने तेवढ्यात सदर कर्मचारी हे त्यांचा काऊटर सोडुन माझ्याकडे येऊन अगदी अर्वाच्च अश्लिल भाषेत 'शिवीगाळ करित माझ्या अंगावर धावुन आले.
'चल व्हय बाहेर ' म्हणून मला सर्वासमक्ष माझ आपमान करुन बँकेच्या बाहेर हाकलुन दिले. ह्या कर्मचारीच्या अश्या वागणुकी मुळे मी प्रचंड माणसिक तणावखाली आहे. आज रोजीच्या बँकेतील सर्व सीसीटीव्ही फुटेज राखुन ठेवण्यात यावेत. अस पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या वादग्रस्त कर्मचा-याची शिवीगाळ सोशल मिडीयावर... या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा हदगावच्या बँक कर्मचाऱ्यांची खातेदाराशी कश्या अश्लिल भाषेत शिवीगाळ व मुजोरीपणा करतात याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.
बँक व्यवस्थापकाची दिलगीरी... महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे हदगाव शहराचे व्यवस्थापक गायकवाड हे नेहमी बँकेच्या खातेदाराशी अगदी सौजन्याने वागतात. काही तांत्रिक आडचण असेल तर स्वतः संबंधित काँटरवर जावुन खातेदाराच्या समस्या सोडतांना अनेक वेळा पाहण्यात आले आहे. पण ज्या दिवशी हा प्रकार घडला ते काही कामा निमित सुट्टीवर गेले होते. या बाबतीत त्यानी झालेल्या प्रकाराबद्दल स्वतः दिलगीरी व्यक्त करत असा यापुढे प्रकार होणार नाही. अस त्यांनी पञकारांशी बोलतांना सागीतले. या बाबतीत माञ पोलिस स्टेशन कडुन माहीती मिळु शकली नाही.