भोकर| येथील दैनिक सकाळचे बातमीदार बाबुराव संभाजी पाटील यांची एकुलत्या एक कन्या बुद्धपुष्पा बाबुराव पाटील यांचे आज ( दिनांक ०४/०५ / २०२२) सकाळीं ६.१५ वाजता अकाली निधन झाले. मृत्युसमयी त्या ३२ वर्षाच्या होत्या.
बुद्ध पुष्पा बाबुराव पाटील यांच्यावर मागील चार दिवसांपासून नांदेड येथील एका दवाखान्यात त्वचा रोगा संदर्भाने उपचार सुरू होते. उपचारादरम्यान अखेर आज सकाळी ६.१५ वाजता त्यांची अचानक प्राणज्योत मालवली. सायंकाळी ०७.००वाजता भोकर येथील बौद्ध समशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या अकाली निधनाने पाटील परिवार मोठी शोककळा पसरली आहे.पाटील परिवारा वरील मायेची सावली हरवली आहे.