संस्थेला यशोशिखरावर घेऊन जाणारे बि. एस. मुंडे गुरुजी आदर्श मुख्याध्यापक - बाबुराव पा. केंद्रे उमरगेकर -NNL


कंधार, सचिन मोरे|
ग्रामीण भागातील गोर-गरीब, कष्टक-यांच्या लेकरांना शिक्षण मिळावे या करिता माझ्या वडीलांनी रामकृष्ण महाराज ऐज्युकेशन सोसायटीची स्थापना केली या संस्थेस आहोराञ 35 वर्षापासून मेहनत घेऊन यशोशिखरावर घेऊन जाणारे बि. एस. मुंडे सर हे एक आदर्श मुख्याध्यापक असुन त्यांच्या कार्यकाळातच संस्थेचा नावलौकिक वाढत आमच्या संस्थेची मोठया प्रमाणात भरभराट झाल्याचे गौरवोउदगार रामकृष्ण महाराज केंद्रे ऐज्युकेशन सोसायटीचे सचिव  बाबुराव पा. केंद्रे उमरगेकर यांनी काढले.

संजय गांधी विद्यालय माळेगाव (याञा) चे मुख्याध्यापक बि. एस. मुंडे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत झाल्यामुळे त्यांचा संस्थेच्या वतीने सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबुराव पा. केंद्रे उमरगेकर (माजी सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती तथा संस्थेचे सचिव  ) तर प्रमुख आतिथी म्हणून चंद्रसेन पाटील (जि.प.सदस्य ), भगवान मुंडे (प.स.सदस्य तथा संचालक ), हाणमंत धुळगंडे ( सरपंच माळेगाव या.), डाँ. सतीश केंद्रे , राजु पाटील, विजयकुमार वाघमारे (पञकार), हाणमंत मुसळे (पञकार), यांची उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बि. एस. मुंडे (मुख्याध्यापक) यांचा सहपत्नीक शाल, श्रीफळ, पुष्पहार व खंडोबाची प्रतिमा आणि पुर्ण कपडे रुपी आहेर , भेटवस्तु देऊन यथोचित गौरव  करण्यात आला. पुढे बोलताना केंद्रे म्हणाले की, संस्थेचे नव्याने रोपटे लावले असताना मुंडे गुरुजी रुजू झाले त्यांनी संस्थेत अनेक उपक्रम राबवत संस्था ख-या आर्थाने नावारुपास आणली असे शिक्षक आम्हास मिळाले म्हणजे आमच्या संस्थेचे भाग्य असल्याचे मत केंद्रे यांनी व्यक्त केले.

सत्कारास उत्तर देताना बि. एस. मुंडे म्हणाले कि, मी गेल्या 35 वर्षापासून या संस्थेमध्ये कार्यरत होतो. या संस्थेतील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना केंद्र बिंदू  मानून त्यांना घडवण्यासाठी मी व माझे सर्व सहका-यांनी परिश्रम घेतले त्यामुळे आमच्या हातुन शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी मोठ-मोठया पदावर आहेत हिच माझ्या जिवनातील खरी कमाई असल्याचे समजतो. संस्थेचे अध्यक्ष केंद्रे यांनी माझ्या सारख्या सामान्य शिक्षकास 5 वर्षे मुख्याध्यापक पदावर व 24 वर्षे पतसंस्थेच्या चेरअमन म्हणून कामाची संधी दिली व ती मी जवाबदारीनी पार पाडली. माझा सन्मान केल्याबद्दल संस्थेचे आभार मानतो.

 मा. चंद्रसेन पाटील (जि.प.सदस्य), हाणमंत धुळगंडे ( सरपंच ), भगवान मुंडे, राजू पाटील, विजयकुमार वाघमारे, डाँ सतीश केंद्रे , एन.एस.वाघमारे यांनी मुंडे सराबदल गौरव उदगार काढले. कार्यक्रमासाठी सौ. शोभाताई मुंडे , जीवन मुंडे, किशोर मुंडे, कु. डाँ. धनश्री मुंडे, शहाजीराव चाटे, संस्थेतील कर्मचारी व नातलग, मिञमंडळी, विद्यार्थी आदिची उपस्थिती होती.

बि. एस. मुंडे सराचा मोठा मुलगा जीवन मुंडे (मँनेजिंग डायरेक्टर एराँर्स कंपनी , मुंबई ) म्हणाले कि, वडिलांनी शैक्षणिक, सामाजिक, कार्य केले एवढेच नसुन आमच्या भांवडावर केलेले संस्कार हे आम्हाला जीवनभर पुरणारी शिदोरी आहे. आणि त्याचा वारसा मी पुढे तसाच चालु ठेवणार यांची हमी देतो. प्रास्तविक संजय पाटील तर सुञसंचलन आनंत पारसेवाड आणि आभार जी. आर. केंद्रे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी