नांदेड| नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतिष्ठित नागरिक कै. रामकृष्ण मारोती गुंडावार यांचे नाव विद्युतभवन ते बाफना या रोडला देण्यात आले. या नामफलकाचे अनावरण शिवसेना आ. बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी शहरातील आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदेड मर्चन्टस् को-ऑपरेटीव्ह बँक, जिल्हा सहकारी बोर्ड, अभिनव भारत शिक्षण संस्था, नांदेड टाऊन मार्केट सोसायटी आणि लोकमान्य सेवा ट्रस्ट या नामांकित संस्थांचे संस्थापक सदस्य राहिलेले रामकृष्ण गुंडावार यांच्या कार्याला उजाळा मिळावा आणि त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी यासाठी शहरातील या मुख्य रस्त्याला त्यांचे नाव देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. या नामफलकाचे अनावरण आ. बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकनाथ मामडे, प्रमुख पाहुणे म्हणून स. विरेंद्रसिंघ गाडीवाले यांची उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी रामकृष्ण गुंडावार यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी धोंडू पाटील, ओमप्रकाश राखेवार, अॅड. श्याम बन, सचिन किसवे, अल्का शहाणे, महेंद्र दासरवार, संघरत्न सोनकांबळे, विजेंद्रकुमार गुंडावार, सुभाष गुंडावार, राजू गुंडावार आणि विश्वास गुंडावार यांची उपस्थिती होती.