राज्यपालांच्या हस्ते भगवान इंगोले यांना कृषीभूषण पुरस्कार प्रदान -NNL


अर्धापूर, निळकंठ मदने|
गेल्या पाच वर्षांपासून आपल्या शेतात रासायनिक खते औषधे पूर्णत बंद करून शेती विषमुक्त केली. सेंद्रिय शेती यशस्वी करून शेतकर्यांत प्रबोधन केल्याबद्दल मालेगाव जि नांदेड येथील युवा शेतकरी भगवान रामजी  इंगोले यांना कृषिभूषण शेंद्रीयशेती   मा.राज्यपाल  भगतसिंह कोशियारी व मान्यवरांच्या हस्ते कृषिभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले  . 

काल २ मे रोजी नाशिक येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत उत्कृष्ट उल्लेखनीय शेती करणार्या शेतकर्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून जाहीर झालेले पुरस्कार देण्यात आले नव्हते  सन २०१७-१८-१९ या तीन वर्षांचे पुरस्कार वितरित करण्यात आले  .राज्यपाल मा भगतसिंह कोशियारी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ ,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात , कृषिराज्यमंत्री विश्वजित कदम, राज्यमंत्री भामरे ,साहेब कृषी ,कृषी सचिव एकनाथ डवले ,आयुक्त धीरज कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय व नावीन्यपूर्ण प्रयोग करणार्या शेतकर्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. लातूर विभागातील सेंद्रिय शेतीसाठीचा कृषिभूषण पुरस्कार हा नांदेड जिल्ह्यातील मालेगाव अर्धापूर येथील युवा संशोधक शेतकरी भगवान इंगोले यांना देण्यात आला  .  गेल्या पाच वर्षांपासून रासायनिक खते औषधे याचा वापर पूर्णपणे बंद करून शेतात लागणार्या सेंद्रिय निविष्ठा स्वत शेतातच तयार करून रासायनिक खतांच्या खतांच्या तुलनेत अधिकचे उत्पन्न काढले व शेतीचे आरोग्य ही राखले. 

तसेच सेंद्रिय शेतीच्या उत्पादनांची प्रतवारी ब्रँडिंग करून स्वतः मार्केटिंग केली. त्यामुळे सेंद्रिय शेतीला चांगले प्रोत्साहन मिळाले. मालेगाव व परिसरातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत सतत मार्गदर्शन करून आवश्यक ती सर्व मदत करण्यातही भगवान इंगोले हे नेहमी सक्रिय असतात त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कृषी विभागाने त्यांना कृषिभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच धामदरी येथील तरुण शेतकरी दत्ता कदम यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी