लोहा| लोहा शहरात ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान.परशूराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने देऊळगल्ली पासून मुख्य रस्त्यावर भगवान परशूराम यांच्या तैलचित्रासह मिरवणूक काढण्यात आली. यावेळी समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहे.
देऊळगल्ली भागातील भगवान परशुराम मंदिरात सकाळी श्री च्या मूर्तीला पवमानसूक्त अभिषेक करण्यात आला. प्रशांत मक्तेदार व गिरीश पेनूरकर यांनी अभिषेक केला त्यानंतर भगवान परशूराम प्रतिमेची नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले व मिरवणूक रथावरून काढण्यात आली. शोभायात्रा ढोल ताशाच्या गजरात भगवान परशुराम मंदीर ते भाजी मंडई अशी मिरवणूक निघाली शोभायात्रेची सांगता मंदिरात महाआरती व प्रसाद वाटप करून करण्यात आली.
लोहा ब्राह्मण महासंघ अध्यक्ष संजय मक्तेदार, उपाध्यक्ष विजयकुमार तोताडे, कोषाध्यक्ष सुदिपराव पेनूरकर, सचिव राजेश्वर पाथरकर, सहसचिव दिपक भातलवंडे, कार्यकारिणी सदस्य अशोकराव शेवडीकर, प्रशांत मक्तेदार, खंडू गुरू जोशी,मुदगल गुरू धाबे, जेष्ठ मार्गदर्शक ह.भ.प.लक्ष्मीकांत महाराज, प्रभाकरराव कुलकर्णी, दिपकराव लव्हेकर,प्रभाकरराव दतोपंत कीटे गुरुजी, मा.ना.कुलकर्णी, सुर्यकांत सनपुरकर,जगदीश पेनूरकर,मदन गुरू खोडवे, बाळू गुरू खोडवे उपस्थित होते. शोभायात्रा नियोजन समितीचे मारोती जोशी, गिरीश पेनूरकर, गजानन बेरळीकर, सुधाकर बेरळीकर, सुनील गुरू कुलकर्णी, विलास तोताडे,शूभम जोशी,हर्ष धाबे तसेच महिला यांचा समावेश होता. बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस उपनिरिक्षक.काळे मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांचा,सत्कार करण्यात आला.