अर्धापूर, निळकंठ मदने| तालुक्यातील पार्डी (म) येथील शेतीनिष्ठ शेतकरी राजकुमार बालासाहेब मदने उर्फ पांडू पाटील यांना २०२२ सालचा कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,केळी पीक सलग तिन वर्षे उत्कृष्ट सरासरीने आणल्याने हा महत्वाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म) जि.नांदेड येथील विविध पुरस्कार प्राप्त शेतकरी राजकुमार बालासाहेब मदने हे प्रयोगशील शेतकरी असून,हाळद,टरबूज व केळी ही पीके सरासरीने जास्तीचे उत्पन्न काढण्यात यशस्वी झाले आहेत, विशेष म्हणजे २०१८ ला पाण्याअभावी ५ हजार केळीची बाग अंतीम महिन्यात पाण्याअभावी वाळल्यानंतर पहिल्यांदा पाण्याचे नियोजन करुन सलग तिन वर्षे केळीची बाग उत्कृष्ट सरासरीने आणली.
शिवाय हाळद पीक ही काढले, त्यामुळे कमी खर्चात सरासरीने जास्त उत्पन्न राजकुमार मदने व बाजीराव मदने यांनी काढले आहे,त्यांना जिल्हा परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे,यावेळी ग्लोबल कंपनीचे साडेपाच हजार केळीची बाग आहे, उपक्रमशील शेतकरी बागेला भेटी देत आहेत, त्यांच्या सोबत नूरखान पठाण देळूबकर, शिवानंद प्रकाश बारसे यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
सिजेंटा इंडीया प्रा.लि.कंपनीचे शैलेष इंदूरकर, तुकाराम औटी,शंकर कोटाकोरुले, इंद्रजीत थोरात,अनिल देशमुख,सोमनाथ शेळके, शिवराज राणे,उदय कटेवार यांची प्रमुख उपस्थिती होती,अमोल सुर्यवंशी,कृषी अधिकारी अनिल शिरफुले,संजय चातरमल,विशाल बारसे,प्रकाशराव बारसे,निलेश देशमुख,रत्नाकर देशमुख,शितल पाटील,कल्याण पाटील,कल्पना साळवे,बी बी गजेवार,सौ.सविता जरीकोटे, निळकंठराव मदने,जी बी मदने यांनी अभिनंदन केले आहे.