नरेंद्र- देवेंद्र महोत्सवाच्या कविसंमेलनात एका पेक्षा एक दर्जेदार कविता सादर -NNL


नांदेड|
येथे पं. दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. सचिन पाटील उमरेकर आणि संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या नरेंद्र- देवेंद्र महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या अखिल भारतीय विराट कविसंमेलनात आमंत्रित कवींनी एका पेक्षा एक दर्जेदार कविता सादर करून रसिकांचे भरपूर मनोरंजन केले. " ...क्यूंकी साऊंड बढीया है...!" या दिनेश देसी घी या हास्य व्यंगाच्या कवीने वर्तमान परिस्थितीवर मार्मिक टिप्पणी करून  अखिल भारतीय विराट कविसंमेलन गाजवत  रसिकांमधून टाळ्यांचा पाऊस पाडत त्यांना दाद देण्यास भाग पाडलं.

कै. चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान, नांदेड येथे हजारो काव्य रसिकांच्या उपस्थितीत भव्य व्यासपीठावर संपन्न झालेल्या या महोत्सवातील कविसंमेलनाचे उद्घाटन संत बाबा बलविंदरसिंगजी यांच्या हस्ते व दिलीप कंदकुर्ते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर भाजपा मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे, प्रदेश कार्यकारणी सदस्य चैतन्यबापू देशमुख व मिलिंद देशमुख, मनपा विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत, भाजपा नेते बालाजी शिंदे कासारखेडेकर, भाजपा ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील माळेगावकर, प्रतिष्ठित व्यापारी सती सतीश सुगनचंदजी शर्मा हे उपस्थित होते. 

चार तास निखळ  मनोरंजन करण्यात आलेल्या या कविसंमेलनाचे मंच संचालन कोटा येथील प्रसिद्ध कवी राजेंद्र पंवार यांनी केले. त्यांनी केलेले बहारदार सूत्रसंचालन आणि शृंगार रसाच्या भोपाळ येथील सुप्रसिद्ध कवीयित्री सबीहा असर यांच्यासोबत झालेल्या जुगलबंदीने हास्य रसिक श्रुंगाररसात न्हाहून निघाले. त्यांनी केलेल्या शेरोशायरीला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. जबलपूर येथील हास्य गीतकार सुदिप भोला यांच्या एका पेक्षा एक हास्य पॅरोडीने  रसिकांना वन्स मोर म्हणण्यासाठी भाग पाडले. नागपूर येथून आलेले हास्य व्यंगाची कवी कपिल जैन यांनी आपल्या गोड आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. 

इंदोर येथून आलेले वीररसाचे कवी मुकेश मोलवा यांनी रसिकांमध्ये कधी राष्ट्रभक्ती जागविली, तर कधी वीर जवानांची आठवण करून देऊन भारत माते प्रतीआपले राष्ट्रप्रेम आपल्या कवितेतून जागविले. तर कधी त्यांच्या काव्य प्रभावाने अनेकांचे डोळे पाणावले. शेवटी त्यांनी दिलेल्या "जय श्रीराम " चा नार्‍याने संपूर्ण कवी संमेलनाचा परिसर दुमदुमून गेला. स्थानिक कवींना मोठे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने दरवर्षी एका कवींना काव्यपाठाची संधी मिळते. या संधीचे कवी संतोष परळीकर सोने करून रसिकांची दाद मिळवली. संपूर्ण कार्यक्रमात क्षणाक्षणाला हास्याचे कारंजे उडत होते. टाळ्यांचा कडकडाट करून प्रेक्षक प्रत्येक  मार्मिक टीप्पणीला प्रतिसाद देत होते. राष्ट्र प्रेमाच्या कवितांनी उन्हाळ्याच्या गरम वातावरणात आणखी जोश भरला. संपूर्ण कार्यक्रमात न हसता दहा हजार रुपये जिंकण्याचे चायलेंज स्वीकारणाऱ्या आठ जणांपैकी एकहीजण यशस्वी झाला नाही. अवघ्या काही मिनिटातच त्यांच्या स्थितप्रज्ञतेचा कवींनी पार बोरा वाजविला.

दरम्यान या विसाव्या अखिल भारतीय विराट कवी संमेलनाच्या सुरुवातीलाच निमंत्रित सर्व कवींचा स्मृतिचिन्ह आणि शाल, शिरोपाव देऊन अध्यक्ष डॉ. सचिन पाटील उमरेकर व संयोजक धर्मभूषण अॅड.  दिलीप ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार अभंगे आणि आभार कामाजी सरोदे यांनी मानले. हजारो रसिकांच्या साक्षीने संपन्न झालेले हे कवी संमेलन  नांदेडकरांना एक अनोखी मेजवानी देऊन गेले. त्यामुळे हे संमेलन रसिकांच्या मनात चिरकाळ स्मरणात राहणारे ठरणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी