नांदेडमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ५ आरोपीना स्थागुशाने पकडले -NNL


नांदेड|
शहर परिसरात विनापरवाना हत्यार बाळगून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ५ जणांना दोन बंदुकीसह ४ गोळ्या आणि दोन घातक हत्यारासह नांदेडच्या स्थागुशाने पकडले आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली असून, गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत असल्याचे यावरून दिसते आहे.

नांदेड शहरापासून नजीक असलेल्या हसापुर परिसरात दि.१७ च्या रात्रीला ५ दरोडेखोर घातक हत्यार, बंदुकीसह दरोडा टाकण्यासाठी आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर याना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यांनी लागलीच याबाबतची माहहती पोलीस उपमहानरीक्षक, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक याना देऊन कार्यवाहीबाबत मार्गदर्शन घेतले. आणि आपल्या विशेष टीमला गस्तीसाठी पाठवून कार्यवाहीचे आदेश दिले होते. 


या पथकाचे पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय काळे, सहाय्यक फौजदार गोविंद मुंडे, जसवंतसिंह साहू यांनी गस्तीदरम्यान मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या कमलेश उर्फ आशु बालाजी लिंबापुरे वय २२ वर्ष रा.वसरनी, नांदेड, श्याम मुंजाजी सोनटक्के वय २२ वर्ष रा.जुना कौठा नांदेड, शिवाजी उर्फ शिवा माधवराव थेट वय २३ वर्ष  रा.टाकळगाव ता.लोहा, जी.नांदेड, काळेश्वर रावण जाधव वय २५ वर्ष, रा.असर्जन व दीपक उर्फ वाघू भुजंग बुचाले वय ३५ वर्ष रा.आवई ता.पूर्णा, याना अटक केली.

वरील पाचही आरोपीकडून दोन पिस्तूल, पाच मोबाईल, चार जिवंत काडतूस, दोरी, मिरचीपूड आणि अन्य घातक शास्त्र व साहित्य असा ७० हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दत्तात्रेय काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यवाहीचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोली, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, यांनी स्थागुशाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व त्यांचे टीमचे कौतुक केले आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी