पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे लोहा - कंधार वर लक्ष -NNL

संघटनात्मक बांधणी - दाजी- भाऊजी समोर आव्हान


लोहा|
लोहा कंधार तालुक्यातील काँग्रेस पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. कंधार येथे कार्यकर्ता मेळावा आणि अंबेसागवी-निळा-पानभोसी -कंधार या रस्त्याचे भूमिपूजन त्यांनी  केले . आगामी काळात लोहा कंधार तालुक्यात  काँग्रेस पक्षाची  ताकद वाढावी कार्यकर्त्यांसाठी नवी उर्जा निर्माण व्हावी हा हेतू  तर दुसरीकडे स्थानिक चे  शेकापचे आ श्यामसुंदर शिंदे यांच्या अनुउपस्थित ७०कोटी रुपयांचा विकास निधीच्या कामांचा शुभारंभ पालकमंत्र्यांनी  केला  त्याची जोरकस चर्चा सुरू असतानाच  पालकमंत्र्यांचे  दाजी -भाऊजी समोर   मोठे  आव्हान राहणार आहे असा  (अ )प्रत्यक्ष संदेश  निमित्ताने  गेला .

लोहा कंधार तालुक्यात १९८० नंतर एकदाही काँग्रेस पक्ष जिंकला नाही .जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर या दोन दशकात गाव पातळीवर संघटनात्मक पकड मजबूत झाली आहे. त्या तुलनेत  राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेची आजची स्थिती फार समाधानकारक नाही त्यात काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेतृत्वात  गटबाजी आहे. ती दूर करून एकत्रित आले तर भाजपाला शह बसू शकतो त्या दृष्टीने कदाचित    पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे प्रयत्नशील असावेत. पाऊणे तीन वर्षांच्या काळात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या मतदारसंघाकडे विशेष लक्ष दिले.दिवाळी नंतर सिचन प्रकल्प, रस्ते-इमारती साठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मतदार संघात त्याच्या अभिनंदन व आभारांचे जाहीर फलक गावोगावी लागले त्याची चर्चा खूप झाली. 

त्यानंतर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी गेल्या आंबेसांगावी-पानभोसी -कंधार या नॅशनल हायवे ३६१टू नॅशनल हायवे ५०  जोडणाऱ्या रोडच्या कामांचा शुभारंभ पालकमंत्री यांच्या हस्ते झाला .लोहा  तालुका अध्यक्ष रंगनाथ भुजबळ यांच्या निळा गावी पंधरा वर्षा नंतर पालकमंत्री गेले त्यांनी भुजबळ गुरुजींच्या कामाची प्रशंसा केली. कंधार मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.भोसीकर यांच्या निवासस्थानी गेले. मतदार संघातील या महत्वाच्या रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्याला आ श्यामसुंदर शिंदे यांचीअनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली त्याबद्दल मतदार संघात उलटसुलट चर्चेला तोंड फुटले.या रोडसाठी भोसीकर काका पुतण्याच्या श्रेयवादावरून   वाङ्मयुद्ध  झाले होते. त्यावर पडदा पडला.

लोहा कंधार तालुक्याच्या पालकमंत्री यांच्या  दौऱ्यात  काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे व काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे यांच्यावर फोकस राहिला .काँग्रेसचे ज्येष्ठ  कै माधवराव पाटील पांडागळे यांच्या पश्चात त्याचे चिरंजीव  बालाजीराव यांच्यावर पालकमंत्री यांचे लक्ष आहे तर दुसरीकडे सर्वसामान्य कुटुंबातील पण पालकमंत्री अशोकराव चव्हाण आणि काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले संतोष पांडागळे यांना संधी देण्याचा प्रयत्न  दिसला.

जिल्ह्याच्या राजकारणात विविध पक्षात कंधार -लोहा तालुक्याने नेतृत्व केले आहे नव्या पिढीच्या संतोष पांडागळे यांना काँग्रेसने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. महात्मा बसवेश्वर पुतळा अनावरण , बसवेश्वर जयंती या कार्यक्रमात पांडागळे द्वयी  अग्रेसर होते हे दोन्ही कार्यक्रम यशस्वी झाले  सगळ्या घडामोडीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या दोन्ही तालुक्यात काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच तुल्यबळ लढत अपेक्षित आहे. पण काँग्रेस मधील गटबाजी शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मविआ आघाडी सोबत राहण्याची इच्छा यावर खूप काही अवलंबून आहे. 

त्याच त्या चेहऱ्यांना संधी ऐवजी नवीन नेतृत्वाला वाव - केवळ निवडणुकीसाठीच मतदार याचा विचार न करता संघटनात्मक बांधणीची गरज आहे भोसीकर- कल्याणराव सुर्यवंशी, डॉ श्याम पाटील तेलंग, संभाजीराव केंद्रे, गिरे , मोरे, पवार, संगेवार,  असा अनेक जुन्या व निष्ठावंत ज्येष्ठाना  सतेच्या लाभ कोणत्याही समितीवर नियुक्ती करून देता येईल पण पाऊणे तीन वर्षात तसे झाले नाही  याकडेही पालकमंत्री यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. मागील पंधरवाड्यात पालकमंत्री यांचा कंधार दौरा खा चिखलीकर -आ शिंदे या दाजी -भाऊजी यांना त्याच्या होम ग्राउंडवर आगामी निवडणुकीसाठी तगडे आव्हान देणारा ठरणार आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी