संजीवनी वाघमारे यांचे निधन -NNL


नांदेड।
शहरातील होळी सराफा भागातील रहिवासी श्रीमती संजीवनी नारायणराव वाघमारे यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी,१० मे रोजी पहाटे ५ वाजता राहत्या घरी निधन झाले.त्या  ७८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुले

श्रीराम वाघमारे, श्रीधर वाघमारे,श्रीकांत उर्फ धनू वाघमारे, मुली सौ. जयश्री दिलीपराव जोशी, सौ.राजश्री कृष्णा उमरीकर, जावई, नातवंडे,पणतू असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता तारा तीर्थ घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

स्वातंत्र्य सैनिक कै.नारायणराव वाघमारे यांच्या त्या पत्नी होत्या.पतीच्या निधनानंतर २० व्या दिवशी श्रीमती संजीवनी यांचे निधन झाले.सेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख धनू वाघमारे यांच्या त्या आई तर पत्रकार कृष्णा उमरीकर यांच्या त्या सासूबाई होत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी