नवीन नांदेड| नांदेड सिडको परिसरातील नागलोक बुध्द विहार येथे बुध्द जयंती निमित्त १६ मे रोजी झालेल्या बैठकीत बुध्द विहार समितीच्या अध्यक्षपदी नवीन नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते विलास गजभारे यांची सर्वानुमत्ते निवड करण्यात आली.
नागलोक बुध्द विहारात बुध्द पौर्णिमा साजरी करण्यात आली याअनुषगांने बुध्द विहाराच्या प्रागंणात सकाळी धम्म ध्वजारोहन गंगाधर आढाव व तुकाराम ढवळे यांच्या हास्ते करण्यात आले. उपस्थित बुध्द अनुयायी बंधु भगिनींने बुध्द मुर्तीचे पुजन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सामुहिक त्रिशरण पंचशील गृहण केले. याप्रसंगी गंगाराम भालेराव, एम.एस.वाघमारे, भि.ना.गायकवाड, किशनराव सोनकांबळे रावणगावकर, बी.डी.कांबळे, विठ्ठल गायकवाड,अमृत नरंगलकर,भिमराव बेरजे,एकनाथ वाघमारे,पांडूरंग कांबळे,रामा सोनसळे,तुकाराम ढवळे,साहेबराव सोनसळे,अनिल बेरजे,सुधाकर ढवळे,गौतम जोंधळे,शेषीकांत हाटकर,बालाजी गवारे,प्रक्षित सुर्यवंशी,प्रशांत हनमते, लक्ष्मबाई भालेराव,वंचाळबाई आढाव, पंचशिला भदरगे, सौ.नम्रता गजभारे ,वत्सलाबाई गायकवाड, वैशाली सुर्यवंशी, रेखा तारू व आदिंची उपस्थिती होती.
बळीरामपुर येथे खिरदान वाटप.. बळीरामपुर येथे बुध्द पोणिॅमा निमित्त बौध्दीवृक्ष महिला बचत गट व वंचित बहुजन आघाडी बळीरामपूर यांच्या वतीने खीरदान वाटप करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन आघाडी चे शहराध्यक्ष विठ्ठल दादा गायकवाड, सुदर्शन भाऊ कांचनगिरे, अमृत नंरगलकर,वैभव लष्करे ,बलमा मस्के, माधव देवकांबळे, सचिन कदम, जिजाबाई मस्के, बेबीबाई कांबळे, कोंडाबाई कोलंबीकर, रमाबाई एंगडे, अहिल्याबाई डोईबळे, गोडबोले मावशी, मायाबाई शेळके ,राधाबाई वाघमारे, कलमबाई चक्रे,गावातील उपस्थित माता-भगिनी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.