नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात सण - उत्सवाची रेलचेल सुरु असताना येथील शासकीय रुग्णालय परिसरात लोखंडी तलवार बाळगून असल्याच्या व्यक्ती मिळून आला असून, त्यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश महोदयांनी जामीन मंजूर केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
दिनांक १५ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १५ .१० वा. चे सुमारास, शहरातील सरकारी दवाखाना हिमायतनगर जाणारे रोडवर हिमायतनगर जि. नांदेड भागातील एका युवकाकडे तलवार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून नमुद आरोपीचा शोध घेऊन तपासणी केली असता विनापरवाना बेकायदेशीर रित्या एक लोंखडी तलवार ताब्यात बाळगलेला मिळुन आला.
याबाबत आरोपीला ताब्यात घेऊन हिमायतनगर पोलीस डायरीत याबाबत सुधाकर लक्ष्मण कदम यांनी दिलेल्या फिर्यादी वरून त्याचेवर गुरनं ६६/२०२२ कलम ४/२५ भारतीय हत्यार कायंदा सह कलम १३५ म. पो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरक्षक बालाजी महाजन हे करत आहेत. त्यास दि. १६ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश महोदयांनी जामीन मंजूर केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
या प्रकारावरून हिमायतनगर शहर व परिसरात गुन्हेगारीच्या मार्गाकडे जात असल्याचे दिसते आहे. मागल्या काळात झालेल्या हिमायतनगर शहरातील दोन खुनाच्या घटना आणि एकावर चाकूने वार करून झालेला खुनाचा प्रयत्न यावरून शहराचे वातावरण ढवळून निघाले होते. एवढेच नाहीतर दि.१४ एपरील रोजी काढण्यात आलेल्या महामानवाच्या मिरवणुकीत एका युवकाने गोंधळ घालून चाकू काढला होता, यावेळी पोलिसांनी प्रसांगावधान राखून त्यास ताब्यात घेतले मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. एकूणच पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या दिवशीची दुर्घटना टाळलीय, मात्र त्याच्या दुसऱ्या दिवशी एकजण शहरात तलवार बाळगून फिरत असल्याने पोलिसांनी अटक केली. एकूणचं या घटनांवरून हिमायतनगर शहरातील कायदा व सुव्यस्था धोक्यात आली असून, या प्रकारावर आळा घालण्यासाठी शहरातील मुख्य चौकात आणि रत्स्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे असल्याचे मत जाणकार नागरीकातून व्यक्त केले जात आहे. तर पोलिसांनी चाणाक्षपणा दाखवीत शहरातुन गुन्हेगारी हद्दपार करण्यासाठी प्रयत्नशील व्हावं अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.