सिडको भागात खून करणाऱ्या दोघांना १९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी -NNL


नांदेड|
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणूकीत सिडको परिसरात एका युवकाचा खून आणि एका युवकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोघांना अटक केल्यानंतर विशेष न्यायालयाने त्यांना १९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

बळीरामपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक सुरू झाल्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास ही मिरवणूक नाईक कॉलेजसमोर आली होती. यावेळी डी.जे.च्या तालावर नाचता-नाचता काही जणांमध्ये आपसात विरोध झाला. या विरोधात बळीरामपूर येथील युवक सचिन उर्फ बंटी थोरातने किशोर ठाकूर आणि शेख आदील या दोघांना तुम्ही मिरवणूकी बाहेर जा असे सांगितले. हा वाद सुरू असताना कोणीही पोलीस हजर नव्हते त्यामुळे वाद वाढला. 

अखेर किशोर ठाकूरने आपल्याकडील चाकु काढून सचिन उर्फ बंटी थोरातच्या शरीरावर वार केले. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात त्याच ठिकाणी खालीपडला आणि मरण पावला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमेध उर्फ बाळा राजू वाघमारे यालाही भरूपर मार लागला असून, सध्या तो शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. तर १५ एप्रिलच्या मध्यरात्री ३ वाजता या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेची कलमे ३०२, ३०७, ३४ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ च्या कलम ३  (२) (व्ही.ए.) जोडण्यात आला आहे. 

सदर गुन्ह्याचा तपास इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांच्याकडे देण्यात आला. गुन्ह्याच्या स्वरुपानुसरा डॉ.सिध्देश्र्वर भोरे व त्यांच्या पथकाने तात्काळ बळीरामपूर मध्ये राहणारे हल्लेखोर किशोर ठाकूर, शेख आदील या दोघांना पकडले. या दोघांना विशेष न्यायालयासमक्ष हजर केल्यानंतर न्यायालयाने ४ दिवसासाठी पोलीस कोठडी मंजुर केली आहे. या हल्यात मयत झालेल्या सचिन उर्फ बंटी थोरातवर १५ एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता शोकाकुल वातावरणात सिडको येथील स्मशानभुमीत अंतिमसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी