नांदेड| महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी संघटन (स्वतंत्र मजदूर युनियन) संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक व संयुक्त सभा शनिवार दि.16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नमस्कार चौकातील हॉटेल गणराज येथे आयोजित करण्यात आली आहे.
विद्युत कंपनीतील मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना ही अधिकारी व कर्मचार्यांच्या जिव्हाळ्याच्या व हक्कांच्या प्रश्नांवर लढणारी अग्रगण्य संघटना म्हणून ओळखली जाते. या संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक व संयुक्त सभा पहिल्यांदा नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ.संजय घोडके, केंद्रीय सरचिटणीस प्रेमानंद मोर्य, केंद्रीय संघटक एस.के.हानवते, केंद्रीय कार्याध्यक्ष वाय.के. कांबळे, मुख्य सल्लागार जे.एस. पाटील, कायदे विषयक सल्लागार नरेंद्र जारोंडे, केंद्रीय कोषाध्यक्ष जीवन गायकवाड यांच्यासह सर्व केंद्रीय उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या महत्वपूर्ण बैठकीला महावितरण व महापारेषण मधील संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माविकसंचे केंद्रीय उपाध्यक्ष सिध्दार्थ पाटील, परिमंडळ अध्यक्ष शंकर घुले, सचिव प्रमोद बुक्कावार यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.