नांदेड| भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतिने समता सप्ताह कार्यक्रमांतर्गत पक्षाच्या शहर (जिल्हा) कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात भारतीय संविधान उद्देशिका (प्रास्ताविका) प्रतिची भेट देण्यात आली.
राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ.गंगाधर सोनकांबळे व ख्यातनाम साहित्यिक डॉ.कविता सोनकांबळे तसेच,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनिल कदम यांना राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा सौ.सिंधूताई देशमुख, जिल्हा सरचिटणीस गणेशअण्णा तादलापूरकर,सय्यद मौला, राहूल जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.