नायगाव, दिगंबर मुदखेडे। कोलंबीचे भुमिपुत्र प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा गोरगरीब जनतेचा पोशिंदा संजय बियाणी यांची दि.५ एप्रिल रोजी त्यांच्या नांदेड येथील निवासस्थाना समोर सकाळी अकरा वाजता अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला करून हत्या केली व त्यात त्यांचा दुदैर्वी मृत्यू झाला . सदरील भ्याड हल्ल्याचा कोलंबी येथील गावकऱ्यांनी शोक सभा घेऊन तिव्र शब्दात निषेध केला.
शनिवारी सकाळी 9 वा. ग्राम पंचायत समोर संजय बियाणी यांच्या आठवणींना उजाळा देत शोक सभा घेऊन सामूहिक श्रद्धांजली वाहन्यात आली या शोक सभेला गावातील शेकडो महीलासह पुरूषांची उपस्थिती होती यावेळी तहसील प्रशासन प्रतिनिधी म्हणुन तलाठी ऐसेकर,व पोलीस प्रतिनिधी म्हणून पो.नि.अभिषेक शिंदे नायगाव याना निवेदन देण्यात आले.
त्या हल्लेखोरांना अटक तर कराच व त्यामागील मुळ सुत्रधाराला तात्काळ अटक करण्यासाठी तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात यावा व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अन्यथादि. १४ एप्रिल रोजी सर्वच स्तरावर आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त सवाल गावकरी यांनी मांडला. गावकरी मंडळी पुढे म्हणाले लोकशाही मागार्चा अवलंब करून हा तपास हस्तांतरित करण्यात यावा नाहीतर प्रशासनाच्या विरोधात रस्ता रोको आंदोलनकरण्याचे जाहीर करण्यात आले.
संजयजी बियाणी शेठ यांच्या हत्येला पाच दिवस झाले तरी नांदेड पोलीसांना अद्याप मारेकराचा तपास लागला नाही ही गोस्ट लाजीरवानी आहे वियाणी शेठ हे आम्हा सर्व कालंबी वाशीयाचे व गोरगरीब जनतेचे कैवारी होते. अडचणीच्या काळात मदतीचा हात देणारा देवमाणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या या निर्घुण हत्येमुळे सर्व गावकऱ्यांना मोठा मानसिक धक्का बसला असून समाजामध्ये त्यांचा विपरीत परिणाम झाला आहे व दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सदरील तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी करण्यात आला.
वासिय नांदेड मध्ये दाखल होऊन हातात कायदा घेऊन रस्त्यावर उतरू यांची सर्वस्वी जवाबदारी प्रशासनावर राहील असा ईशारा शोक सभेतून संतप्त गावकऱ्यांनी दिला. यावेळी आप्पा बैस, ग्रामसेवक टि. जी. पाटील संजय मुदळे, प्रवीण बैस,मु.अ.डोमशेर सर,नरसिंग पोतलवाड,सुदाम लांडगे,सचिन बेंद्रीकर,शिवा पाटील गडगेकर,लातूरचे बियाणी यांचे जावई मयूर मंत्री पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे,यांनी आपल्या वाणी तुन शोक व्यक्त करीत श्रद्धांजली वाहीली शेवटी बाळासाहेब पांडे यांनी आपल्या भावनांना उजाळा देत सविस्तर मार्गदर्शन केले व गावकऱ्यांना सयम ठेवण्याचे आव्हाहन केले.प्रदीप शिंदे , शिवा पाटील गड़गेकर, सरपंच संघटनेचे ता.अध्यक्ष सचिन पा. बेद्रीकर पो.नि. अभिषेक शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या.
माजी सरपंच शिवाजी पाटील,कोंडीबाराव बुरपल्ले,शिवदत पोतलवाड, सरपंच प्रतिनिधी प्रल्हाद बैस, उपसरपंच प्रतिनिधी ज्ञानोबा बैस, परविन बैस,मनोहर बुरपले अमिलंकंठवार, तलाटी येशेकर ,पत्रकार लक्ष्मण बरंगे . शेषेराव कंधारे यांच्या सह गावातील असंख्य नागरीक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते अनेकांनी संजय बियाणी यांना आपल्या मनोगतातुन श्रद्धांजली वाहीली.