लोंढे सागवी जवळील घटना
उस्माननगर, माणिक भिसे। नांदेड ते उस्माननगर राष्ट्रीय महामार्गावरील मौजे लोंढे सांगवी पुलाजवळ कार व टिपरच्या भीषण अपघातात एका माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 16 एप्रिल रोजी चार च्या दरम्यान घडली.
नांदेड हुन उस्माननगर फाटा मार्गे पानभोसी ता. लोहा येथील माजी सैनिक शिवानंद विठ्ठल नाईकवाडे हे कंधारकडे स्वतःच चालवित होते. कार क्रमांक एम.एच.26 एएफ .0197 ही भरधाव गाडी पुलाजवळ येताच उस्मानननगर कडून नांदेड कडे जाणारा टिपर क्रमांक MH 04 FB 6909 यांची आमने सामने टक्कर होऊन कारमधील माजी सैनिक जागीच मरण पावले.
या आपघाताची माहीती मिळताच सोनखेड पोलिस स्टेशन चे आधिकारी, कर्मचारी घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सैनिक यांच्यावर रात्री हुशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ ,एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. उस्माननगर राष्ट्रीय महामार्गावर वाहनाची वर्दळ वाढली असून आपघाताचे प्रमाण वाढत आहेत.