बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा जोपासण्याची गरज -साहित्यीक डॉ.कविता सोनकांबळे -NNL


नांदेड|
विश्‍वरत्न,परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व कर्तृत्व शब्दा पल्याडचे असून ते शब्दात मांडणे शक्य नाही त्यांनी केलेल्या कार्याचा व त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा जोपासणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.कविता सोनकांबळे यांनी व्यक्त केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नांदेड शहर (जिल्हा) नांदेड च्या वतीने आज राष्ट्रवादी समता सप्ताह अंतर्गत नांदेड शहर (जिल्हा) कार्यालयात आयोजित कार्यक्रमातप्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील कदम तर प्रमुख  वक्ते म्हणून प्रसिद्ध साहित्यिक, अभ्यासक डॉ.कविता सोनकांबळे होते. या व्याखान कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या सौ. कल्पनाताई डोंगळीकर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. सिंधुताई देशमुख

जिल्हा सरचिटणीस गणेशअण्णा तादलापुरकर, सय्यद मौलाना भाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रौफ जमीनदार सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल जाधव, शिख सेल जिल्हाध्यक्षा प्रेमजीतकौर कोल्हापुरे, भिमराव क्षीरसागर,राष्ट्रवादी किसान सभेचे लक्ष्मण भवरे,सईदा पटेल, मोहमद्दी पटेल,गोविंद (बच्चू) यादव, गंगाधर कवाळे पाटील,पाशा खान तांबोळी,अमित कांबळे, आकाश ठाकूर, माधव चिंचाळे कृष्णा पुयड, जीलानी पटेल सरजू वाघमारे,भारत कांबळे,अनिकेत वाकोडे,दुलार यादव, अनिकेत खोडे, पुष्पक, चंद्रकांत कोलमकर, वेदांत यादव, मन्मथ अलमखाने, रोहित यादव, सूर्यकांत कोलमकर, अभिषेक यादव, कृष्णा यादव, ओंकेश माने, दिपक ठाकूर यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पूढे बोलतांना डॉ. सोनकांबळे म्हणाल्या की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून आज देशाची अखंडता व एकता अबाधित असून त्यांनी यावेळी डॉ. आंबेडकरांनी केलेल्या कार्यावर आपल्या मनोगतातून उजाळा दिला.तसेच,या महामानवांच्याच विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी समाजकारणातून राजकारण करित प्रत्येक समाजघटकांना न्याय देत आहेत सद्यस्थितीत केंद्रातील सरकार देशात धार्मिक तेढ निर्माण करुन वा विविध प्रकारच्या माध्यमातूनसर्वसामान्य जनतेची आर्थिक कोंडी करित आहे.

त्यासाठी जनतेला त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी व या देशात पूनश्‍चसमानता नांदावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात समता सप्ताह राबवित आहे हि अभिमानाची बाब असल्याचेही त्या म्हणाल्या. या प्रसंगी अध्यक्षीय समारोपात बोलताना डॉ. सुनील कदम म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशातील सर्व समाजघटकांना त्यांच्या न्याय व हक्क मिळवून दिला. प्रत्येक क्षेत्रात त्यांचे  कार्य असून त्यांच्या प्रत्येक पैलूवर त्यांनी प्रकाश टाकला व त्यांच्या कार्याचा गौरव केला.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांचे बहुजना प्रति मौलिक कार्य असून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद नाम विस्तारासह, महिला आरक्षण व सक्षमीकरण अशा एक ना अनेक कामांतून समतेचा संदेश दिला व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा रुजविण्याचा ते सातत्याने प्रयत्न करीत असतात पक्षाकडून डॉ. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने राज्यभरात राबवित असलेल्या राष्ट्रवादी समता सप्ताहांतर्गत नांदेड शहर व पदाधिकारी यांच्या वतीने आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवित असून प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी समजून यासाठी तत्पर राहावे. असेही आवाहन डॉ.कदङ्क ङ्मांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक वक्ता सेल चे जिल्हाध्यक्ष एकनाथवाघमारे यांनी तर आभार सामाजिक न्याय विभागाचे शहर सरचिटणीस अमित कांबळे यांनी मानले.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी