शनि मंदिर व संकट देवस्थान हडको येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा -NNL


नविन नांदेड।
श्री शनि मंदिर देव व श्री संकट मोचन हनुमान मंदिर देवस्थान हनुमान जन्मोत्सव  उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी सामुदायिक अभिषेक, हनुमान चालीसा पठण व महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले होते.
    
गेल्या १९  वर्षा पासून याही वर्षी ,शनिवार १६ एप्रिल २०२२ खालील कार्यक्रांचे आयोजन श्री हनुमान जयंती सोहळा सकाळी ५,३० वा. दहि  दुधाचा सामुदायीक महाअभिषेक गुरु श्री शशिकांत  महाराजांच्या अधिपत्याखाली संपन्न झाला , त्यानंतर हनुमान चालीसा श्री शनि चालीसा वाचन महाआरती अजिवन अभिषेक यजमान श शिवांव आनेराव,  रंगनाथराव आष्टुरकर,  करणसिंह ठाकुर, के. सदाशिव बडेवार, श्रीकांत शेषेराव देशपांडे,  गंगाधर नागनाच चालीवार यांचा दस्ती नारळ देवून ऊपसिथीत बालाजी मंदिर देवस्थान हडको चे अध्यक्ष अरूण दमकोडंवार,आंंनद सागर सोसायटी चेअरमन संतोष वर्मा व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला 
 
महाप्रसाद(भंडारा) अजिवन अन्नदाते यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप दुपारी १० वाजता सुरू करण्यात आले यात प्रा. अशोक मोरे, करणसिंह ठाकुर, निवृत्ती जिंकलवाड, डॉ. विजयानंद भोंग , वसंतराव बोरलेपवार, केशवराव वानखेडे,  किशनराव ठिगळे, विजयराव पल्लेवाड,  संतोष पवीतवार,  शिवाजी पा. घोगरे, श्रीमती प्रयागबाई बळराम टेहरे,  रमेशराव शिंदे, राधेशाम भारतीया,  संतोष आनंदराव पांडे, श्री आनंदराव वासरीकर,  शेषेराव व्यंकटराव शेटे,  डॉ. प्रकाश शिंदे. सतिश बाळासाहेब मोरे,  शंकरलालजी धुत, गंगाधर नागनाथ चालिकवार, विश्वनाथ उगे वजीरगांवकर, आशिष कहाळेकर,शैलेंद्र वट्टमवार,  शिवानंद बंडू वट्टमवार,  संजय सितारामजी जाजू ,वासवी क्लब सिडको अध्यक्ष शिवानंद निलावार व पदाधिकारी यांच्या सहकार्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
    
हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात साठी विश्वस्त समितीचे करणसिंह ठाकूर, गोपीनाथ कहाळेकर, संजय जाधव पाटील , बाळासाहेब चव्हाण, दत्तात्रय सागुरे , रावसाहेब जाधव, बालाजी कवटीकवार, विश्वनाथ गुंठे,किरण आनेराय, नरसिंग ठाकूर,देवबा कुंचेलीकर, त्रयंबक सरोदे,यांच्या सह पदाधिकारी वासवी पदाधिकारी , महिला यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी