विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम आवश्यक -तहसीलदार व्यंकटेश मुंढे -NNL


लोहा|
वाढदिवस पुण्यतिथी करताना अवांतर खर्चास फाटा देऊन त्यातून गावातील जि.प. शाळा दर्जदार करण्यासाठी व आवश्यक ते शैक्षणिक साहित्य शाळेला दिले तर त्याचा आपल्याच गावातील विद्यार्थ्यांना फायदा होईल त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी मदत होईल असे प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन तहसीलदार व्यकटेश मुंडे यांनी केले.

सावरगाव (न) येथील पत्रकार जगदीश पाटील कदम यांनी वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने शालेय साहित्य वाटप तहसीलदार मुंडे ,नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थिती झाले. शाळेला डायस भेट दिला. मुख्य अतिथी तहसीलदार व्यंकटेश मुंडे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी होते. पंचायत समितीचे माजी उपसभापती बालाजी पाटील कदम सावरगावकर, गटविकास अधिकारी शैलेश वावळे ,नायब तहसीलदार अशोक मोकले,गटशिक्षण अधिकारी रवींद्र सोंनटक्के, मेडिकल असोसिएशनचे तालुका अध्यक्ष दिनेश मोटे ग्रामसेवक सघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सभाजी धुळगंडे सरपंच राजू भावे ,केंद्र प्रमुख बनसोडे ,मुख्याध्यापक खेडकर शालेय समिती अध्यक्ष बालाजी कदम शिक्षक बडगिरे, बालाजी बालाघाटे आदी मान्यवर उपस्थित होते. 

शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार पॅड शालेय साहित्य व शाळेत भाषण करण्यासाठी आवश्यक असलेले डेक्स भेट देऊन चांगला उपक्रम राबविला. त्यांचा आदर्श घेऊन इतरांनी ही पुण्यतिथीसाठी अवांतर खर्चाला फाटा देत पत्रकार जगदीश कदम, व मुंजाहरी कदम या भावंडांनी सामाजिक दायित्व जोपासत गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले, शाळेला डायस दिला.

गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे सावरगाव येथील शाळेची गुणवत्ता चांगली असून, विद्यार्थ्याच्या सर्वागीण विकासासाठी क्रीडांगणची गरज असून यासाठी जागा उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन लोह्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले .जगदीश कदम यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून नवा सुरुवात केली असे उदगार मान्यवरांनी काढले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी