राष्ट्रवादीचे आमदार मिटकरी हे सतत वादग्रस्त वक्तव्य करत असतात.राष्ट्रवादी काँग्रेस संकल्प अभियानांतर्गत कार्यक्रमात आ.मिटकरी बोलताना त्यांनी हिंदू धर्मातील पवित्र असलेल्या कन्यादान प्रथेबाबत अत्यंत चुकीचे विधान केले,मंत्रोच्चार करून त्याचा चूक अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते.विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व मंत्री धनंजय मुंडे व्यासपीठावरून त्यांना चिथावणी देत होते,अजून मंत्रोच्चार करा असा इशारा करत होते.खरे तर जयंत पाटील व धनंजय मुंडे हे राज्याचे मंत्री आहेत,त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेताना जात,पात,धर्म,लिंग यामध्ये भेदभाव करणार नाही सगळ्यांना समान न्याय देईल अशी शपथ घेतल्यावर देखील ते निर्लज्जपणे हसत होते.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार जी सतत हा पुरोगामी महाराष्ट्र आहे असे बोलत असतात पण त्यांच्याच पक्षाचे मंत्री असे मागासलेले विचार व्यक्त करतात व धार्मिक तेढ निर्माण करतात.
कोल्हापूरच्या समारोप सभेत देखील आ.मिटकरी पुन्हा एकदा बरळले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस जातीवादी नाही हे सिद्ध करण्याची पवार साहेबांना संधी होती त्यांनी तात्काळ दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घ्यायला पाहिजे होते पण ते तसे करत नाहीत उलट राष्ट्रवादी अशा लोकांना पाठीशी घालण्याचे काम करते हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे.अनिल देशमुख,नवाब मलिक यांना देखील असेच वाचवण्यात आले तेव्हा ते मिटकरी वर काही कार्यवाही राष्ट्रवादी काँग्रेस करेल असे वाटत नाही म्हणून भारतीय जनता पार्टीने आज आमदार मिटकरीच्या पुतळ्याचे दहन केले
विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह मा.निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले तेव्हा भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले,विजय गंभीरे, धर्मभूषण अॅड.दिलीप ठाकूर,अशोक पाटील धनेगावकर, अनिलसिह हजारी,शितल खांडील,बालाजी गिरगांवकर, स.दिलीपसिग सोडी,मनोज जाधव,केदार नांदेडकर,मारोती वाघ,आशिष नेरलकर,भालचंद्र पत्की, बालाजी सूर्यवंशी ,अंबादास जोशी,आदित्य जोशी, अपर्णा चितळे,बजरंगसिंह ठाकुर,संदिप कराळे,कुणाल गजभारे,अंकुश पार्डीकर,राजाराम टोम्पे,नितीन गायकवाड उपस्थित होते तर सुत्र संचलन संतोष परळीकर यानी केले.