हिमायतनगर येथील बालसंस्कार केंद्र भावी पिढी घडविणारे म्हणून उदयास येईल- श्री नागनाथ अक्कलवाड -NNL


हिमायतनगर|
बाल वयातच मुलांवर होऊन योग्य संस्कार व्हावेत. विद्याथ्यांना सर्वगुण संपन्न बनविणे, त्यांचे आत्मबल मनोबल वाढवून, आई-वडील, शिक्षक, अतिथी तसेच देश इ. विषयक आदर निर्माण करणे, मूल्यशिक्षणातुन संस्कार, नैतिकता व चारित्र्याचे संवर्धन करणे हे महत्वपूर्ण कार्य परमेश्वर मंदिर कमिटीच्या पुढाकार आणि गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून घडणार आहे. त्यामुळे येथील बाळ संस्कार केंद्र देशाची भावी पिढी घडविणारे म्हणून नक्की उदयास येईल असा विश्वास सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री 
नागनाथ अक्कलवाड यांनी केले. 


ते मराठी नववर्ष गुढीपाडव्याचा शुभमुहूर्तावर हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात बाल संस्कार  केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. सुरुवातीला पूजन करून बालसंस्कार केंद्राचा शुभारंभ सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागनाथ अक्कलवाड यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून दीपप्रज्वलन करून झाला. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे संस्थापक गोपाळ महाराज मुरझलेकर, वऱ्हाडे सर, कंठाळे सर, हरडपकर सर, झाडे साहेब, वामन बनसोडे, अनिल मादसवार, विठ्ठलराव फुलके, विठ्ठल देशमवाड, परमेश्वर इंगळे, गंगाराम गड्डमवाड, गोविंद कदम, जाधव महाराज, आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी पुढे बोलताना अक्कलवाड म्हणाले कि, विद्यार्थ्यांना लहान वयात चांगले संस्कार मिळाले तरच भावी पिढी चांगली घडेल. यासाठी परमेश्वर मंदिर कमिटीने पुढाकार घेऊन बालसंस्कार केंद्र सुरु करण्यात आले, यामध्ये चिमुकल्या बालकांना परमेश्वर इंगळे व गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्वांचे सहकार्य लाभणार आहे.


या बाल संस्कार केंद्रातून विद्यार्थी सर्वगुण संपन्न व समाजशील घडावेत म्हणून विविध कला, क्रीडा, कौशल्य विकास, स्तोत्र मंत्रांचे पठण, प्रार्थना, ध्यान, योग, 
विज्ञान ऋषीमुनींनी केलेल्या संशोधना विषयी जागृती, सुसंकल्प करणे असे विविध उपक्रम राबविले जातात. तसे पाहता गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षपासून आपापल्या विभागात विनामुल्य मार्गदर्शन व ज्ञान शिबीर घेऊन सेवा करतात. त्याच सेवेचा एक भाग म्हणून आज बाल संस्कार केंद्राची सुरुवात करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. 


प्रत्येक ईश्वराची शक्ती आहे, कुणात गुरु शंकराचार्य, कुणात स्वामी समर्थ, कुणात छत्रपती शिवाजी महाराजा, कुणात छत्रपती संभाजी महाराज, कुणात गौतम बुद्ध, कुणात भगवान महावीर, कुणात विवेकानंद, कुणात बाबासाहेब आंबेडकर आणि काहींमध्ये पंतप्रधान बनण्याची क्षमता आहे. त्यां विद्यार्थ्यंना योग्य दिशा देण्याची गरज असून, बालसंस्कार केंद्रातील मुले हुशार व्हावीत आणि यातून देशाचे उज्वल भविष्य घडेल. असे अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी