भीम जयंतीनिमित्त महिला वीट कामगारांना कपडे वाटप -NNL


नांदेड|
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त वाजेगाव परिसरातील १०० नंबर वीटभट्टीवर महिला वीट कामगारांना कपडे वाटप करुन सप्तरंगी साहित्य मंडळाने कामगारांसोबत भीम जयंती साजरी केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक पांडूरंग कोकुलवार तर प्रमुख अतिथी म्हणून सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, स्तंभलेखक शंकर गच्चे, मारोती कदम, जितेंद्र लोणे, रणजीत गोणारकर, हनिफ शेठ, राहुल गजभारे, सुनील नरवाडे, दिपक एडके, काशिनाथ एडके, ससाणे, शिरसे यांची उपस्थिती होती. 

येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने वाजेगावातील राधास्वामी सत्संग ब्यास जवळच्या वीटभट्टीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महिला वीट कामगार अनुसया कांबळे,  चांगुणा एडके, छाया मेकाले, रत्नमाला एडके, लता जुळवेकर, शोभा एडके, पुजा शिंदे, आशा एडके, सुषमा शिंदे, शितल कांबळे, सोनी कांबळे नित्योपयोगी कपड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच पुरुष कामगार रवी एडके, नागेश मेकाले यांनाही कपडे देऊन सन्मानित करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन रणजीत गोणारकर यांनी केले तर आभार विशालराज नांदेडकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिया गायकवाड, माया एडके, गोविंद कांबळे, रोशनी गायकवाड, आकांक्षा गायकवाड राहुल गायकवाड, गोविंद कांबळे, निवृत्ती एडके, सुरेश एडके, रविकिरण एडके, गणेश एडके, माधव मेकाले, सूनील एडके, विठ्ठल शिंदे, कुणाल भुजबळ, माधव शिंदे, सिध्दार्थ गजभारे, शै. सलीम, निखिल जोंधळे, किसन तारु, निखिल दामोदर, सतिश ढवळे, देवा गायकवाड, डोमपल्ले, हैबती शिंदे, विठ्ठल शिंदे, नागेश मेकाले, अरविंद जुळवेकर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी