याच औचित्याने कधी नव्हे ती सामाजिक कार्यक्रमात एकत्र आलेली ही मंडळी नेमके काय बोलेल याकडे जिल्हाभराचे लक्ष वेधले होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उदघाटक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, तर विशेष उपस्थितीत खा. प्रतापराव पा चिखलीकर,आ.विक्रम काळे, माजी खा. सूर्यकांत्त्ताताई पाटील, खा. हेमंत पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील,आ. निलंय नाईक, आ. राजेश पवार, आ. श्यामसुंदर शिंदे, प्रवीण भाऊ साले, माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, माजी आ. वसंतराव चव्हाण, आ.मोहन अण्णा हंबरडे, आ.बालाजी कल्याणकर, आ. तुषार राठोड,आ. जितेश अंतापुरकर, माजी आ. गंगाराम ठक्करवाड,माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा,माजी आ. हणमंतराव बेटमोगरेकर, आ. बालाजी कल्याणकर,माजी आ.गंगाधरराव पटणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर,नांदेड महापौर जयश्री पावडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी आंबूलगेकर, माधवराव पाटील शेळगावकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर,मोहनराव पाटील टाकळीकर, उद्योगपती मारोतराव कवळे गुरुजी,बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील भिलवंडे, शिवराज पाटील होटाळकर, पुनमताई पवार, वसंत सुगावे, जेष्ठ पत्रकार संजीवभाऊ कुलकर्णी, , बाळासाहेब धर्माधिकारी, संभाजी भिलवंडे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना फडणवीस यांनी बुलेट ट्रेन संदर्भात राज्यशासनाने मदत केली तर अहमदाबाद ते मुंबई नाही तर मुंबई ते हैद्राबाद ही बुलेट ट्रेन जपानच्या अर्थ सहकार्याने धावेल, व येथील उद्योग व्यवसाय व रोजगराला मोठी चालना मिळेल या बुलेट ट्रेन साठी जपान पूर्ण पैसा खर्च करण्यास तयार आहे.
राज्यशासनाने या प्रश्नाकडे लक्ष वेधने गरजेचे असल्याचे मत अशोक चव्हाण यांनी बुलेट ट्रेन संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर आपली प्रतिक्रिया भाषणातून व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश कुंटुरकर, बाळासाहेब धर्माधिकारी, सूर्यकांत पा कदम, सूर्याजी चाडकर, गजानन जुने रूपेश कुंटुरकर नगरीचे सरपंच मारोतराव कदम, निलेश देशमुख, शेख आयुब, बाळू दगडुमवार, माजी पंचायत समिती सदस्य सुजलेगावकर, कुंटुरकर मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.
राज्यातील वाढत चाललेला पोलिटिकल वॉर बंद करा... सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण राज्यात सद्यस्थितीत चालु असलेला पोलिटिकल वार बंद झाला पाहिजे माझी दोन्हीकडील नेत्यांना हात जोडून विनंती आहे. एकत्र बसा आणि आपापसातील वाद संपुष्टात आना यामुळे राज्याचा राजकारणाचा स्तर अतिशय खालावत चालला आहे तो राष्ट्रविघातक आहे. तसे देवेंद्रजी व मी मुंबईत शेजारी शेजारी आहोत.
त्यामुळे उगी एकमेकांची काने भरू नका आम्ही दोघेही एकमेकांशी कोण कोणाकोणाला काय बोलले ते शेर करतो.आम्ही शेजारी शेजारी आहोत म्हनून कुठली मॅच फिक्सिंग ही करीत नाही. पण मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी ही काम झालं पाहिजे त्यासाठी गडकरी सहेबांशी अनेक प्रोजेक्ट संदर्भाने बोलणे होते त्यांचे काम महाराष्ट्रासाठी अतिशय चांगले असल्याची स्पष्टोक्ती ही त्यांनी यावेळी केली. गंगाधररावजी कुंटुरकर यांचे राजकारण व राजकीय कारकीर्द मी अतिशय जवळून पाहिली आहे.असे रुबाबदार, देखणं, धुरंधर व्यक्तीमत्व होणे नाही असे ही ते म्हणाले.