आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून लढा देणार - आ. डॉ.तुषार राठोड
आमच्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यी व कर्मचाऱ्यांची जात वैधता प्रमाणपत्रासाठी आडवणुक करणाऱ्यां जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी सह - संचालक दिनकर पावरा यांची आमदार साहेबांनी तडकाफडकी बदली करून न्याय मिळवून दिल्याबद्दल आज आदिवासी समाज बांधवांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला आहे.आ. राठोड साहेबांनी आमचा सत्कार सन्मान स्विकारल्या बद्दल साहेबांचे पुनश्च एकदा मनःपूर्वक धन्यवाद. अशी प्रतिक्रिया अशोकराव गजलवाड आदिवासी कोळी महासंघ ता.अध्यक्ष मुखेड यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित समाज बांधवांना संबोधित करतांना मुखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.डॉ राठोड यांनी सांगितले की आदिवासी कोळी व आदिवासी मनेरवारलू समाजाचा प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहामध्ये मांडुण समाजातील विद्यार्थ्यांची व कर्मचाऱ्यांची जाणीवपूर्वक आडवणुक करणाऱ्या औरंगाबाद येथील आदिवासी जात प्रमाणपत्र पडताळणी सह - संचालक दिनकर पावरा यांची तात्काळ बदली केली आहे. व समाजाच्या अन्य प्रलंबित मागण्यांबाबत येत्या अधिवेशनात आवाज उठवुन समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला धारेवर धरू आणी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आदिवासी महादेव कोळी, आदिवासी मनेरवारलू समाजाला न्याय मिळवून देणार असल्याचे त्यांनी बोलतांना सांगितले.
या भव्य सत्कार सन्मान कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.विरभद्र हिमगीरे,मा.सभापती लक्ष्मण पा.खैरकेकर, रिपाइं जिल्हाध्यक्ष गौतमजी काळे, कृ.उ.बा. समितीचे सभापती खुशाल पा.उमरदरीकर,भाजपा नेते व्यंकटराव लोहबंदे ,जेष्ठ पत्रकार शिवाजी कोनापुरे, यशवंतराव बोडके, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिरसे, नगरसेवक उत्तम बनसोडे, गंगाधर पिटलेवाड, दत्ता पाटील बेटमोगरेकर, भाजपा शहराध्यक्ष किशोरसिंह चौहान, सुधीर चव्हाण, अतुल बनसोडे, जेष्ठ नेते वसंतराव नाईनवाड, वसंत अण्णा संबुटवाड, बालाजी लिंगनवाड, पं.स.मा.उपसभापती मारोती मामा फसकुलवाड, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष तथा कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष अशोकराव गजलवाड, डाॅ.बालाजी गुडमेवाड, डाॅ. विरभद्र लंगेवाड, व्यंकटेश संबुटवाड,हनमंत नारनाळीकर, शिवा मुद्देवाड, व्यंकट गंदपवाड, युवा नेतृत्व राजेश गजलवाड ,प्रा.कंचेवाड,शंकर नाईनवाड, संजय नाईनवाड, शिवाजी बोंनलेवाड, राजु गंदपवाड, माधव तोटावार, राजु गुडमेवाड, विलास गडमवाड, सरपंच विष्णु तोटेवाड, भीम पैलवान . वेंकट संमराळे .मारोती घालेवाड, चंद्रकांत गुडमेवाड, सतीश गुडमेवाड. वैजनाथ लोखंडे. शिवाजी समराले.शिवाजी दारेवाड. मनोज गंदपवाड, यांच्या सह आदिवासी कोळी महादेव व आदिवासी मुन्नेरवारलू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.