युवा ग्रुप शिवजन्मोत्सव सोहळ्यात हभप शिवलीलाताई पाटील यांचे समाजप्रबोधन पर किर्तनाचे आयोजन -NNL


नविन नांदेड|
युवा ग्रुप सिडको चा वतीने शिवजन्मोत्सव सोहळा निमित्ताने , किर्तनकार हभप शिवलिलाताई पाटील यांच्या समाजप्रबोधन किर्तन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन १६ मार्च रोजी जिजाऊ सृष्टी सिडको येथे सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.

नांदेड जिल्हायांचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, माजी पालकमंत्री डि.पी.सांवत, आमदार अमर राजूरकर,आ.मोहनराव हंबर्डे,  माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पु पा.कोंढेकर,विठ्ठल पावडे यांच्या  वेळोवेळी मार्गदर्शनमुळे सामाजिक, प्रबोधन,व किर्तन , महिलांच्या व युवकांचा जनजागृती करण्याचे काम युवा ग्रुप ने केले आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवजन्मोत्सव सोहळा २०२२ निमित्ताने गेल्या ९ वर्षांपासून नितीन बानगुडे पाटील,जेष्ठ पत्रकार निखील वागळे,हभप विजय तनपुरे महाराज,हभप बाळु महाराज गिरगावकर, यांच्ये समाजप्रबोधन कार्यक्रम तर सामाजिक बांधिलकी असलेल्या शिवाजी नगर अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहला तसेच शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा या कार्यक्रमाचे आयोजन युवा ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले होते,.

तर भव्य दिव्य मोटार सायकल रॅली हजारो युवकांच्या ऊपसिथीत  काढण्यात आली होती. तर तीन वर्ष महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे तसेच 'स्वच्छ सिडको सुंदर सिडको' या संकल्पनेतुन सिडको हडको परिसरात कचरा पेटीचे वाटप तसेच रक्तदान शिबिर, वरुक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वर्षी समाजप्रबोधन किर्तन सोहळा किर्तनकार ह.भ.प.कु.शिवलिलाताई पाटील यांच्या आयोजित करण्यात आला आहे.

समाज घडवण्याचे शक्तिशाली माध्यम म्हणजे कीर्तन कलेचा पूर्वापार चालत असलेला हा वारसा चिरंतन पुढे नेण्यासाठी, या शिवजन्मोत्सव सोहळ्यास सहपरिवार उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक तथा युवा गुप्रचे संस्थापक अध्यक्ष ,सतिश पाटील बस्वदे जिल्हाउपाध्यक्ष,युवक काँग्रेस नांदेड शहर व युवा ग्रुप पदाधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी