नांदेड| येथील मायनॉरिटी मीडिया असोसिएशन तर्फे रविवारी असोसिएशनचे अध्यक्ष अल्ताफ अहमद सानी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकाचे आयोजन करण्यात आले. उर्दू पत्रकारितेला 200 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत अनेक सूचना आल्या, त्यासाठी लवकरच विशेष बैठक बोलावण्यात येणार आहे. याशिवाय, अनेक प्रस्ताव विचाराधीन आहेत, ज्यामध्ये उर्दू पत्रकारितेचा 200 वर्षांचा इतिहास प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडला जाणार आहे. परिसंवादांबरोबरच विशेष पुस्तिका, काव्यवाचन, निबंध लेखन, पत्रकारांसाठी प्रशिक्षण शिबिरे आदींचा समावेश आहे. विशेष बैठकात उर्दू पत्रकारितेला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महापालिकेचे उपमहापौर अब्दुल गफ्फार यांच्या हस्ते लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपमहापौर अब्दुल गफ्फार यांनी उर्दू पत्रकारितेच्या प्रदीर्घ इतिहासाबद्दल आनंद व्यक्त करून 200 वा वर्धापन दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीत मोहम्मद ताहेर सौदागर, मोहम्मद मुनताजबुद्दीन, मोहम्मद सादिक, वकील मोहम्मद शाहिद, मोहम्मद रेहान, जमीर अहमद खान, झहीरुद्दीन बाबर, नासिर सानी, शेख अक्रम, तारिक हसन, मुनवर खान, हैदर अली, हामीद अझहर, मुबीन कमरानी, मोहम्मद सिराजुद्दीन, मोहम्मद समीम , मोहम्मद इम्रान, इशान खान, मोहम्मद मुशर्रफ, सरफराज खान, मोहम्मद सरफराज यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.