शिवणी, प्रकाश कार्लेवाड। तालुक्यातील मौजे कंचली येथील कॉ.जयश्री तानाजी राठोड यांचे दिर्घआजाराने काल दि.०२ मार्च बुधवार रोजी दुपारी साडेतीन वाजता निधन झाले.
कॉ.जयश्री राठोड यांनी १९९५ पासून गावच्या राजकारणाची सुरुवात केल्या होत्या त्या मौजे कंचलीत येथे मागील काळात दोन वेळेस सरपंच म्हणून होत्या.
आणि त्यांनी एकूण सहा वेळेस निवडणूक लढविली होत्या त्या सोबतच जलधारा गणातून पंचायत समिती साठी दोन वेळेस निवडणुकीच्या रिंगणात ही होत्या.
त्यांच्या निधन पाश्चात्य परिवारात त्यांचे पती तानाजी राठोड व दोन मुले, एक मुलगी नातू नातवंड असा मोठा परिवार असून कर्करोगाच्या आजाराने त्यांचे निधन झाले असे कळते तर आज दि.०३ मार्च गुरुवार रोजी सकाळी ०९ वाजता कंचली येथे अंत्यसंस्कार आयोजिले आहे.