पोलीस निरीक्षकाच्या निलंबनासाठी करवंदे यांचे मुंबईत अमरण उपोषण -NNL


नांदेड|
राहुल करवंदे यांनी 17 जानेवारी 2022 रोजी गु.र. नं. 22 / 2022 क्र.07 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 प्रमाणे आरोपी रघुनाथ वानखेडे व पोलीस स्टेशन भोकर चे ठाणेदार यांच्याविरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. परंतु यांचा मुख्य कर्ता व करविता पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या वरती ही हाच गुन्हा दाखल करून त्यांची भोकर येथून बदली करून निलंबित करण्यात यावे. अन्यथा आझाद मैदान मुंबई येथे करवंदे हे एप्रिल महिन्याच्या 20 तारखेला आमरण उपोषण करणार असल्याचे पोलीस महासंचालक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

 सविस्तर वृत्त असे की गुन्ह्यातील आरोपी रघुनाथ वानखेडे व पोलिस स्टेशनचे ठाणेदार हे भोकर शहरात व तालुक्यात बिल्डींग मटरेल वाहतुकीसाठी गाड्या  चालवायच्या असल्यास राहुल गौतम करवंदे यांच्याकडून त्यांच्या दोन्ही गाड्या साठी 18000 रुपये प्रती माह हप्ता द्यावा लागेल असे त्यांना रघुनाथ वानखेडे यांच्या कडून सांगण्यात आले होते. तसेच 27 /12/ 2021 रोजी हप्त्यापोटी 3000 रुपये रघुनाथ वानखेडे यांना दिले व त्यानंतर त्यांना उर्वरित रक्कम 15000 रुपये लाच स्वरूपात हप्ता द्यायची त्यांची इच्छा नसल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे करवंदे यांनी ठरविले.

विकास पाटील हे पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत होते याची माहिती करवंदे यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी सदरील तक्रार ही नांदेड परिक्षेत्रातील जिल्ह्यात न करता ती अमरावती येथे केली. या तक्रारीनंतर दि.05 जानेवारी2022 रोजी सापळा पडताळणी कार्यवाही करण्यासाठी पंचा सह आंबेडकर चौक भोकर येथे ते गेले असता त्यादरम्यान वानखेडे यांनी त्यांना भोकर शहरात गाड्या चालवायचा असतील तर दहा टायर गाडीसाठी 10000 रुपये व 6 टायर गाडी साठी 6000 रुपये. साहेबांचे 16000रुपये व वानखेडे यांच्यासाठी प्रत्येकी गाडीला 1000रुपये असा एकूण 18000 रुपये हप्ता द्यावा लागेल. तसेच त्यांनी पूर्वी दिलेले तीन हजार रुपये घेतल्याची कबुली वानखेडे यांनी कबूल केले होते. त्यावेळी श्री वानखेडे यांनी त्यांना एक हजार रुपये परत कमी घेण्याचे सांगितले.

वानखेडे यांनी वारंवार साहेबांचा उल्लेख केल्याने करवंदे यांनी त्यांना साहेबांची भेट करून देण्याची विनंती केली असता त्यांनी विकास पाटील यांची भेट घेण्याकरता पोलीस स्टेशन भोकर येथे घेऊन गेले. त्यांना विकास पाटील यांच्या केबिनच्या बाहेर ठेवून वानखेडे हे आत गेले व थोड्याच वेळात बाहेर येऊन त्यांना म्हणाले की, तुमच्यावर भरोसा असेल तर त्यांना पैसे तुमच्याकडे द्यायला सांगा. धंदा करायला सांगा असे साहेबांनी म्हटल्याचे सांगून साहेब भेटण्यास नकार दिल्याचे सांगितले. त्यानंतर सापळा कार्यवाही एफ. आय. आर. मध्ये नमूद प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे. 

पण वानखेडे यांनी विकास पाटील यांच्या सांगण्यावरून त्यांच्यासाठी व स्वतःसाठी पैशाची मागणी केली आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या वरती ही कारवाई करून निलंबित करण्यात यावे असे निवेदनात नमूद केले आहे. करवंदे यांच्या व कुटुंबीयांच्या जीवितास धोका असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी