या शिबिराचे आयोजक रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे व सहकार्यक्रमाधिकारी डॉ. एल. बी. डोंगरे यांनी या शिबिराच्या आज पाचव्या दिवशी सकाळी कार्यक्रम पत्रिकेतील दिनचर्या नुसार प्रशिक्षणार्थी कडून योग व व्यायाम करुन घेतला. तसेच सकाळी आठ ते बारा या वेळेत शिबिरार्थींनी प्रत्यक्ष परिश्रम करण्यास सुरुवात केली. आणि सरसम येथील श्री हनुमान मंदिर, बालाजी मंदिर, बुद्ध बिहार या सारख्या धार्मिक स्थळांसह गावची जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडी, एस बी आय बँकेच्या परिसराची स्वच्छता करून त्यांचे सुशोभीकरण करण्यात आले.
या परिश्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शेख शहेनाज प्रा. डॉ. सय्यद जलिल, डॉ. डी. सी. देशमुख, प्रा. एम. पी. गुंडाळे आदींनी छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुप, महात्मा गांधी ग्रुप, भगतसिंग ग्रुप आदि ग्रुप ना संबंधित प्राध्यापकांनी विभक्त करून शिबिरार्थी कडून नियोजन पूर्ण काम वेगवेगळ्या ठिकाणावर जाऊ करून घेतले. यावेळी शिबिरास खास भेट देण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांनी खास भेट देऊन विद्यार्थ्यांना अल्पोपहाराची मेजवानी दिली. तदनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या घेतलेला कामाचा वसा पूर्ण केला.
तसेच या सत्राचे दुसरे मार्गदर्शक क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ. डी. के. माने यांनी स्थूलता एक सामाजिक समस्या या विषयावर भाष्य करताना सांगितले की, आजच्या समाजामध्ये खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी मुळे आणि मसाले व तसेच फास्ट फूड, जंक फूड मुळे आरोग्यावर कसा परिणाम होतो. याविषयी सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले. या सत्राचे तिसरे मार्गदर्शक असलेले इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. वसंतराव कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शेती, पर्यावरण व वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयाची मांडणी करताना म्हणाले की, शिवाजी महाराज हे आधुनिक विचाराचे समर्थक होते.
त्यांनी त्या काळामध्ये शेतीविषयीचे जे तत्त्वज्ञान, व पर्यावरण रक्षणाचे उपाय ते तत्त्वज्ञान आज शेती साठी कसे उपयुक्त आहे. व तसेच त्यांचे अनेक वैज्ञानिक विचार त्यांनी अभ्यास पूर्ण मांडले. तर चौथे मार्गदर्शन म्हणून लाभलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. परभणकर यांनी मुलं आणि मुली यांच्यात वयानूसार होणार्या बदलाचा अभ्यास पूर्ण वार्तालाप केला. यावेळी डॉ. वैभव नखाते उपस्थित होते. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप हिंदी विभागाच्या प्रा. डॉ. शेख शहेनाज यांनी चारही वक्त्यांच्या भाषणातील सार घेऊन वैचारिक मांडणी करून केला.
हे सत्र यशस्वी करण्यासाठी खास प्रयत्न निलेश चटणे व अक्षय बासेवाड यांनी केले. तर सुरेख सूत्रसंचलन महात्मा गांधी ग्रूपच्या विद्यार्थिनी प्रिया शिंदे व वैष्णवी अडबलवाड या दोघींनी केला. तर आभार प्रदर्शन अक्षय बासेवाड यांनी केला. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.