नांदेड| आशा हॉस्पीटल समोरून जात असतांना पावडेवाडी नाका ते काबरानगर रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या २ अज्ञातांनी महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे गंठण तोडून पाल काढला आहे. हि घटना काल दि. २० मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, फिर्यादी वैशाली दिगंबर स्वामी हि महिला दि.२० मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या वेळी आपल्या स्कुटीवर बसून आपल्या घराकडे जात होती. दरम्यान रस्त्यावरील आशा हॉस्पीटल जवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे गंठण किंमत ६० हजार रुपयांचे जबरीने हिसका मारून चोरून घेऊन पळून गेले आहेत.
या संदर्भात वैशाली दिगंबर स्वामीने दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीसांनी गुरन. ९८/२०२२ कलाम ३९२, ३४ भादंवि कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरील गंठण चोरीच्या घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक शेख हे करीत आहेत. या घटनेमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या गंठण चोरांचा बंदोबस्त करून यापुढे अश्या घटना होणार नाहीत यासाठी पोलिसांनी कठोर पाऊले उचलावीत अशी मागणी होत आहे.