पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सहशिक्षक केशव दादजवार यांना जिल्हास्तरीय गुरूगौरव पुरस्कार प्रदान -NNL


अर्धापूर, निळकंठ मदने|
तालुक्यातील दाभड येथिल भुमिपुत्र पिंपळगाव (महादेव) येथिल जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक केशव दादजवार यांना सपत्निक पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते जिल्हास्तरीय गुरूगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सहशिक्षक केशव दादजवार यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेवून नांदेड जिल्हा परिषदेच्या वतिने त्यांना जिल्हास्तरीय गुरूगौरव पुरस्कार देण्यात आला. माजी मुख्यमंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सहशिक्षक केशव दादजवार यांना सपत्निक गुरूगौरव पुरस्कार देण्यात आला. 

या प्रसंगी जि.प.अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर ,माजी पालकमंत्री आ.डी.पी.सावंत, आ. अमरनाथ राजूरकर,आ.बालाजीराव कल्याणकर ,आ. मोहन आण्णा हंबर्डे , माजी आ.हनमंतराव पाटील बेटमोगरेकर ,जि.प.सदस्या डॉ. मिनलताई खतगावकर, शिक्षण सभापती संजय बेळगे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर, शिक्षणधिकारी (प्रा) सौ.सविता बिरगे ,शिक्षणाधिकारी (मा)  प्रशांत दिग्रसकर यांची उपस्थिती होती.

सहशिक्षक केशव दादजवार यांना जिल्हास्तरीय गुरूगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल अर्धापूर पंचायत समिती सभापती सौ.कांताबाई अशोक सावंत , जि.प.सदस्या सौ.संगीता सुनिल अटकोरे , काँग्रेसचे सरचिटणीस संजय देशमुख लहानकर,तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे ,जि.प.सदस्य बबनराव बारसे, जिल्हासचीव निळकंठराव मदने, गटशिक्षणाधिकारी ससाने ,शिविअ सोनटक्के ,शिविअ राठोड ,केंद्रप्रमुख विनोद देशमुख , नगराध्यक्ष छत्रपती कानोडे नगरसेवक राजु शेटे,प्रविण देशमुख,  उमेश सरोदे, प्रा.डॉ.रघुनाथ शेटे,प्रा.संतोष लंगडे, सुनिल धोबे,नागेश क्यातमवार,संतोष राऊत, लक्ष्मीकांत मुळे, सखाराम क्षीरसागर, गुणवंत विरकर,गोविंद टेकाळे,सरपंच सौ.कांचन सुर्यवंशी  व रविंद्र सुर्यवंशी यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी