खा.हेमंत पाटील यांच्याकडे गावकर्यांनी केली निवेदनाद्वारे मागणी
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातून होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अंदाजपत्रकाच्या शेड्युलनुसार करण्यात यावे. तसेच भविष्यात घडणारे अपघात थांबविण्यासाठी शहरातून उड्डाण पूल, डिव्हायडर आणि मंजुरी प्रमाणे रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे. अशी मागणी खा.हेमंतभाऊ पाटील यांच्याकडे हिमायतनगर शहरातील नागरिकांच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे. या संदर्भात लवकरच एक शिष्टमंडळ केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना.नितीनजी गडकरी यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हिमायतनगर शहरातील गावकर्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, हिमायतनगर रेल्वे गेट ते कोठारी ता.किनवट पर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रं.१६१ चे काम मागील तीन वर्षापासुन रखडत सुरु आहे. सदरचे काम सुनिल हायटेक कंपनीच्या नांवे देवुन पुढे कृष्णानंद इन्फ्रा या कंपनीस दिलेले आहे. तीन वर्षाच्या काळात सदर कंत्राटदाराने नियमाप्रमाणे काम केले तर नाहीच त्या शिवाय रस्त्याची उंची, रुंदी कमी केली आहे. त्याच बरोबर संबंधित रस्ता कडक मुरुमापर्यंत खोदकाम न करता वरच्यावर जुन्या डांबरी रस्त्यावर मटेरियल टाकुन दबाई करुन थातुर - मातुर काम करण्यांचा सपाटा संबंधित गुत्तेदारांनी चालविला असुन, त्यास संबंधित विभागाचे अभियंत्यांची मुक संमती दिसत आहे. ज्याचा योग्य तंज्ञाकडुन मुल्याकन होणे गरजेचे आहे.
केंद्र शासनाच्या जोडरस्ते प्रकल्पास बगल देवुन, भारतीय दळण वळणाची प्रक्रिया वाढवुन सक्षम भारत करण्यांच्या दृष्टीकोणतुन हिमायतनगर रेल्वे गेटवर उड्डाणपुल प्रस्तावीत आहे तो होणार यात तीळमात्र शंका नाही. राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या कमानी पासुन जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपुल प्रस्तावीत होता, परंतु येथील काही भुमाफीयांनी हेतुपुरस्परणणे स्वत:च्या जमिनीचे मुल्य कमी होवू नये म्हणुन उड्डाणपुल रद्द करण्यांचा घाट घातला आहे.सदरचा पुल रद्द होवु नये अशी सामान्य नागरीकांची मागणी आहे. सदरील रस्त्यावर दुभाजक असणे जरुरी आहे तरी दुभाजक व उड्डाणपुल अंदाजपत्रकानुसार करणे जरुरीचे आहे.
येथील उड्डाणपुल रद्द झाल्यास किनवट आदिलाबादकडे जाणारी वाहने सदर रस्त्यातुन भरधाव वेगाने जातील मोठ्या व जडवाहनाने वारंवार होणाऱ्या अपघातास संबंधित रस्ता कारणीभुत होवु शकतो. भविष्यातील वाढती लोकसंख्या त्याच बरोबर वाढणारी वाहने यामुळे नागरीकांची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाचे काम करुन प्रस्तावीत रेल्वे उड्डानपुल व त्यास जोडुनच मेरी माता सेन्टर (सवना गेट) पर्यंतच्या उड्डाणपुल दोन्ही उड्डानपुलाचे काम करुन विकास कामांना गती दयावी, कुठल्याही स्थानिक लोकप्रतिनिधी वा पदाधिकारी किवा कार्यकर्त्यांच्या तक्रारीच्या अर्जाचा विचार करुन उड्डानपुल रद्द करु नये तसे झाल्यास कांही मुठभर लोकांच्या हिताकरीता सर्वसामान्य नागरीकांना पायदळी तुडविता येणार नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
अन्यथा सर्वसामान्य विकासप्रेमी नागरिकांना लोकशाही मार्गाचा अवलंब करावा लागेल अशी वेळ आम्हा नागरीकांवर येणार नाही अशी अपेक्षा आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रति नितीनजी गडकरी साहेब, केद्रिय सडक परीवहन मंत्री, नवी दिल्ली, मा.ना.मुख्यमंत्री साहेब, म.रा.मुंबई, मा.ना.श्री.अशोकरावजी चव्हाण साहेब, नांदेड जिल्हा पालकमंत्री, मा.जिल्हाधिकारी साहेब, नांदेड, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग नांदेड, मा.उपकार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग.भोकर व पत्रकार बांधवाना पाठविले आहे.
अन्यथा हिमायतनगर शहर अपघाताचे केंद्र बनणार - मुधोळकर - हिमायतनगर शहरात प्रस्तावित असलेल्या शेड्युलमध्ये फेरबदल करून काही स्थानिक राजकीय लोकांनी व काही धनदांडग्यांनी आपल्या स्वार्थासाठी येथील उड्डाण पूल आणि रस्त्याची रुंदी कमी करण्याचा घाट रचला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबानी प्रस्तावित केलेल्या कामात कोणताही फेरबदल होत नसतो हे आम्हाला माहित आहे. मात्र शहरात उड्डाण पूल रद्द केला अशी चर्चा होते आहे. जर पूल रद्द करण्यात आला तर भविष्यात येथे मोठे अपघात होतील आणि हिमायतनगर शहर हे अपघाताचे केंद्र बनेल. त्यासाठी आपण खासदार या नात्याने उड्डाण पूल रद्द होणार नाही. आणि शेड्युलनुसार रत्स्याची रुंदी वाढविण्यात येऊन डिव्हायडर होणे गरजेचे आहे. तसेच या कामाला गती मिळावी आणि पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होऊन प्रवाशी नागरीकी, वाहनधारकांची होणारी अडचण दूर करावी. अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक प्रभाकर अण्णा मुधोळकर यांनी निवेदन दिल्यानंतर प्रास्ताविक भाषणात व्यक्त केली.