उस्माननगर येथील दुर्लक्षित वार्डातील रस्त्याचे भाग्य उजळणार - सी. सी. रस्त्याचे काम सुरू -NNL


उस्माननगर, माणिक भिसे|
वारंवार मागणी करुन सुद्धा प्राथमिक सोयी सुविधा पासून दुर्लक्षित असलेल्या उस्माननगर येथील वार्ड क्रमांक ४ व वार्ड क्रमांक ५ मधील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीट होतं असल्यामुळे वंचित असलेल्या रस्त्याचे भाग्य उजळत आहे.    

मध्यवस्ती मधील रस्त्यांवर वरुन चालणे सुध्दा अवघड झाले होते.पावसाळ्यात नागरिकांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत असे, वेळोवेळी लोकप्रतिनिधी आश्र्वासन देवून मते पदरात पाडून निवडून येतात. पण याकडे ठोस उपाययोजना करण्यात कानाडोळा केला जात असे . गल्लीतील दुरदर्शा पाहून लोहा कंधार विधानसभा मतदारसंघांचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे खंदे समर्थक, सामाजिक  युवा कार्यकर्ते बालाजी इसादकर यांच्या प्रयत्नातून वार्ड क्रमांक ४ मधील शिवालय प्रांगण ते गोरे, नागय्यास्वामी मंदिर पाठीमागून जाणारा व आता राष्ट्रीय महामार्ग मुळे महत्वाचा ठरणार आहे असा रस्ता सी. सी. बनवण्यात येत आहे. 

वार्ड क्रमांक ५ मधील नवीन वसाहती स्थापन झालेल्या असताना अंतर्गत रस्त्याची वानवा होती. पावसाळ्यात या भागातील गावकरी मंडळींना चालने जिकिरीचे ठरले होते. जवाहरलाल नेहरू वसतिगृह ते बसवेश्वर वरिष्ठ महाविद्यालय पर्यंत चा हा महत्वपूर्ण रस्ता तयार करण्यात येत आहे. फक्त रस्ता तयार करण्यात येत असताना दोन्ही बाजूंना सांडपाणी नाल्या तयार करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी