गायकवाड कुटुंबातील ३ जण करणार दि. २३ मार्च रोजी आत्मदहन
नांदेड| कै. सोपान तादलापुरकर क्रीडा मंडळ संस्थेला महात्मा गांधी व्यसनमुक्ती जनजागृती अनुदान मिळाले नसल्याने, तसेच अनुदानापासून सातत्याने गुणानुक्रमे संस्थेचे कार्य चांगले असताना सुध्दा डावलत असल्याने दि. २३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर कुटुंबीय आत्मदहन करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष कैलास गायकवाड यांनी सांगितले.
व्यसनमुक्ती जनजागृती प्रचार व प्रसार पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ११ लाख रुपयांचे अनुदान महाराष्ट्रातुन १२ संस्थांना दिले जाते. कै. तादलापुरकर संस्था ही मागील २०१६ सातत्याने प्रस्ताव दाखल करतात. सर्व निकष असतानाही संस्थेला अनुदानापासून डावलले जाते. आजतागायत संस्थेला महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय ३ पुरस्कार मिळाले आहेत.
ईतर संस्थेला १०० पैकी ६९ गुण तर कै. तादलापुरकर संस्थेला १०० पैकी ७७ गुण आहेत तरीही डावलले जाते. या बाबतीत अनेकदा पाठपुरावा केला परंतु अद्याप न्याय मिळालेला नाही. या सर्व बाबीला कंटाळून दि. २३ मार्च रोजी गायकवाड कुटुंब आत्मदहन करणार आहे असे कैलास गायकवाड यांनी दि. २८ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे सांगितले आहे.