लोहा| राज्यातील १२ ते१४ वयोगटातील विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन लसीकरण राबविले जात आहे. जुन्या लोह्यातील शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयात जिल्हा परिषद नांदेड व जिविका हेल्थकेअरच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली.या वयोगटातील विद्यार्थ्यांना कार्बोवॅक्स ही लस देण्यात आली
मुख्य कार्यकरी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक भूमिपुत्र डॉ नीलकंठ भोसीकर , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिंदे, यांच्या मार्गदर्शना खाली शाळास्तरावर कोर्बोवॅक्स ही लस १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अब्दुल बारी यांनी लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नीलकंठ भोसीकर यांनी उपरोक्त वयोगटातील लसीकरण पूर्ण झाले पाहिजे यासाठी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या आहेत.
शिवछत्रपती विद्यालयात विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक डी इ वडजे यांनी विद्यार्थ्यांचे लसीकरण बाबत समुपदेशन केले यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एच जी पवार यांची उपस्थिती होते. या टीम मध्ये डॉ विजय गायकवाड समुउपदेशक धम्मा पवार, परिचारिका अर्चना गवळी, अनिता मिनकीकर, संतोष सोनवळे, वैशाली जाधव, यांचा समावेश होता.विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.