लोहा| मराठवाडा खादी व ग्रामउद्योग समिती नांदेड यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल या संस्थेचे सचिव व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आ ऍड ईश्वरराव भोसीकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भेट घेतली त्याचा सत्कार केला व निधी दिल्या बद्दल आभार व्यक्त केले.
मागील महिन्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कंधार विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे एकमेव आमदार राहिलेले ऍड ईश्वरराव भोसीकर यांच्यावर मुंबई येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. वयाची ऐंशी ओलांडलेल्या भोसिकरांनी या वयातही आजारावर मोठ्या हिमतीने मात केली.
गेले काही दिवस घरीच ते विश्रांती घेत आहेत .त्यांचे चिरंजीव संजय भोसीकर, प्राचार्य राजीव भोसीकर तसेच जिल्ह्यशल्यचिकित्सक डॉ नीलकंठ भोसीकर यांनी त्यांच्या प्रकृती विषयी विशेष काळजी घेतली आहे.असा परिस्थिती त्यांनी आजारावर मात केली.
जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी गादी ग्रामोउद्योग समितीसाठी निधी दिला त्यामुळे या संस्थेला उर्जितावस्था निर्माण होणार आहे. रोजगार निर्मितीत वाढ होणार त्यामुळे संस्थेचे सचिव व कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते ईश्वरराव भोसीकर यांनी पालकमंत्री यांची भेट घेतली त्यांचा सत्कार केला व आभार मानले.