शाहीर बेटकबिलोलीकर, पवार, सौ.डोंगळीकर, जोशी, देशमुख, डॉ.अंबाळकर, खिल्लारे, पाटील, डॉ.नामवाड, डॉ.सुरनरे यांना समतागौरव पुरस्कार जाहीर -NNL

पालकमंत्री ना.चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी येळेगांवमध्ये कलामहोत्सवात होणार मान्यवरांचा गौरव 


नांदेड|
बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र,पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ व मातोश्री जनाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांत उत्तुंग योगदान असलेल्या मान्यवरांना यंदाचे राज्यस्तरीय समतागौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण व मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी दि.२६ मार्च रोजी येळेगांव ता.अर्धापूर येथे शाहीर व्यंकटराव बेटकबिलोलीकर, कामाजी पवार,सौ.कल्पनाताई पाटील डोंगळीकर,डॉ.प्रमोद अंबाळकर, हास्यसम्राट सिद्धार्थ खिल्लारे, के.डी.देशमुख आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीप्रमुख तथा,बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा.भवरे,पुरस्कार निवड समितीचे सदस्य तथा,जिल्हास्तरीय मान्यवर वृद्ध साहित्यिक व मान्यवर वृद्ध कलावंत मानधन निवड समितीचे उपाध्यक्ष ह.भ.प. व्यंकट महाराज जाधव,स्वागताध्यक्ष वसंतराव कपाटे,संयोजक संभाजी सावते,निमंत्रक तथा अर्धापूर पंचायत समितीचे उपसभापती अशोक कपाटे,आयोजक लक्ष्मणराव मा.भवरे यांनी दिली.

कलामहोत्सव व विविध क्षेत्रांत उत्तुंग योगदान असलेल्या मान्यवरांना समतागौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण व मा.आ. अमिताताई चव्हाण यांच्या शुभहस्ते व नांदेडच्या बाजार समितीचे सभापती आनंदराव कपाटे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच, माजी पालकमंत्री डि.पी.सावंत, आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहन हंबर्डे, आ.बालाजी कल्याणकर,आ.माधवराव पाटील जवळगांवकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर, गणपतराव तिडके, नरेंद्र चव्हाण, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, दलितमित्र किशोर भवरे, दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील निर्माता व दिग्दर्शक एस.व्हि. रमणराव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर,शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंदराव पाटील बोंढारकर, उमेश मुंडे,बबनराव बारसे,तिरुपती कोंढेकर, कैलास माने, संजय देशमुख लहानकर,मराठी पञकार परिषदेचे विभागीय सचिव प्रकाश कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप नागापूरकर आदींसह जिल्हास्तरीय मान्यवर वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलावंत मानधन निवड समितीचे पदाधिकारी तसेच,स्थानिक लोकप्रतिनिधी व अनेक मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या सोहळ्यात बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र,पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ व मातोश्री जनाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था येळेगांव च्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांत उत्तुंग योगदान असलेल्या मान्यवरांना राज्यस्तरीय समतागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.यंदाच्या या पुरस्कारासाठी जेष्ठ शाहीर व्यंकटराव बेटकबिलोलीकर,मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, यशस्वीनी अभियानाच्या समन्वयीका सौ.कल्पनाताई डोंगळीकर,सिने अभिनेता डॉ. प्रमोद अंबाळकर,जेष्ठ पत्रकार व ख्यातनाम गायक विजय जोशी,सेवानिवृत्त सहा. वनसंरक्षक के.डी.देशमुख,डॉ.पि.बी. नामवाड, लोककवी वामनदादा कर्डक अकादमी किनवटचे प्रा.सुरेश पाटील, लेखक-दिग्दर्शक व गीतकार भिमराव कावळे, डॉ.इरवंत पल्लेवाड, हास्यसम्राट व झि.टी.व्ही.स्टार सिद्धार्थ खिल्लारे,सा.वैद्यकीय अधिकारी डॉ.सीमा सुरनरे या मान्यवरांची निवड करण्यात आलीआहे. सोबतच,कोरोना महामारीच्या काळात यशस्वी कार्य केलेल्या येळेगांवच्या आशा स्वयंसेवीका श्रीमती ललिता गोवंदे,श्रीमती मीना सावते, श्रीमती धम्मदिनी घोडगे तसेच,मान्यवर वृद्ध साहित्यिक व मान्यवर वृद्ध कलावंत मानधन निवड समितीच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष व पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा.भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२६ मार्च रोजी येळेगांवमध्ये होऊ घातलेल्या कलामहोत्सव व मान्यवरांच्या गौरव सोहळ्याची जिल्हाभरात व्यापक प्रसिद्धीसह जय्यत तयारी सुरू असून या कार्यक्रमाला तमाम शाहीर,लोकपारंपारिक कलावंत व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष वसंतराव कपाटे,सहस्वागताध्यक्ष आनंदराव कपाटे, संयोजन समितीचे अध्यक्ष आनंदराव सावते, सरपंच सौ.सरस्वती गंगातीर,यादव सावते, आयोजक लक्ष्मणराव मा.भवरे,संयोजक संभाजी सावते,गिरजाजी सावते,संजय सावते,बाबुराव कपाटे,प्रभु कपाटे,यशवंत थोरात,किरण वाघमारे आदींनी केले आहे.

...............

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी