इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेची निदर्शने - तरोडा नाका परिसरात एक तास वाहतूक खोळंबली -NNL


नांदेड|
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शनिवारी शिवसेनेच्यावतीने राज्यभर निदर्शने करण्यात आली. नांदेड उत्तर मतदार संघातही शहरातील तरोडा नाका येथील शेतकरी चौकात शिवसेना शहरप्रमुख सचिन किसवे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने केली. जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, युवा सेनेचे समन्वयक बळवंत तेलंग, तालुकाप्रमुख जयवंत कदम, दयाल गिरी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.


शनिवारी सकाळी ११ वाजता तरोडा नाका शेतकरी चौक येथे शिवसैनिकांनी गॅस दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने केली. कहॉं गये अच्छे दिन, बहुत हो गई महंगाई... अशा घोषणांचे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. जय भवानी, जय शिवाजीचा नारा देत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या दरवाढीच्या धोरणाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करताना थाळीनाद करुन शिवसैनिकांनी केंद्र सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती सतत वाढत आहेत. त्यामुळे गृहीणींचे बजेट कोसळले आहे. सर्वसामान्य नागरिकांना या दरवाढीचा फटका बसला आहे. 

त्यामुळे अच्छे दिनचे स्वप्न दाखविणार्‍या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सामान्य जनतेचा विश्‍वासघात केला आहे, अशा शब्दांत शहरप्रमुख सचिन किसवे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांनीही आपल्या भाषणातून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी उपशहरप्रमुख राजू मोरे, संतोष मादनवाड, मनोज ठाकूर, मुन्ना राठौर, पिंटु सुनपे, उमेश दिघे, राजू गुंडावार, कुरेश यादव, नवनाथ काकडे, संतोष बारसावडे, विठ्ठल खोंडे, शिरीष महाबळे, प्रणव बोडके, बंडू देशमुख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी