दिलीप ठाकूर यांना मिळाला सदुसष्ठवा पुरस्कार
नांदेड| गेल्या सदोतीस वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात अनेक उपक्रम राबवून सतत कार्यरत असणारे धर्मभूषण ॲड. दिलीपभाऊ ठाकूर यांना इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स कमिशनच्या वतिने नॅशनल अवार्डने नुकतेच सन्मानित करण्यात आले असून त्यांना हा सदुसष्ठवा पुरस्कार मिळाला असल्यामुळे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
अंजुमन इस्लाम मुंबईचे अध्यक्ष साबिर सय्यद,सबू सिद्दिक पॉलिटेक्निक मुंबईच्या प्राचार्या जेबुन्निसा मलिक, मिस एशिया पॅसिफिक सुधा जैन हैदराबाद, प्रतिष्ठित व्यापारी अज़ीम सौदागर, पोलिस निरीक्षक साहेबराव नारवाड़े, ज्येष्ठ समाजसेवक वसीमभाई, प्रा. वस्ताद यांच्या हस्ते हॉटेल विसावा मध्ये झालेल्या समारंभात पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रदेश सचिव नईम खान यांनी प्रास्ताविक करताना असे सांगितले की, कोरोना काळात लोकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सतत कार्यरत असणे, तेरा वर्षात चार लाखापेक्षा जास्त गरजूंना जेवणाचे डबे देणे, हिवाळ्यात रस्त्यावरील बेघरांना ब्लॅंकेट देऊन मायेची ऊब देणे, गरजूंना पावसाळ्यात छत्र्या वाटप करून कृपाछत्र देणे
कोरोना लस घेणाऱ्यांना एक वर्षापासून दररोज मास्क सैनीटायझर बिस्किट पाण्याची बॉटल वितरित करणे, तेरा महिन्यापासून दरमहा वेड्याची कटिंग दाढी, स्नान करून नवीन कपडे देऊन कायापालट करणे, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना धान्याचे किट वाटप करणे यासारखे अनेक उपक्रम दिलीपभाऊ ठाकूर यांनी राबविल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात येत असल्याचे सांगितले. अनेक शेरोशायरी करून अन्वर खान यांनी उत्कृष्ट संचलन केल्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. दिलीप ठाकूर यांना यापूर्वी राज्यातील सत्ताविस सामाजिक संस्थांनी कोविड योध्या म्हणून सन्मानित केले होते. तसेच रेड एफएम तर्फे नांदेडके सांता हा पुरस्कार , धर्मभूषण ही उपाधी, मराठवाडा भूषण पुरस्कार
आदर्श शिवसैनिक पुरस्कार,राजपूत भूषण पुरस्कार,माँ जिजाऊ रत्न पुरस्कार, समाज विभूषण पुरस्कार,राजे छत्रपती शिवाजी सेवाभाई पुरस्कार ,मातोश्री गंगूताई पुरस्कार,जीवन साधना पुरस्कार,भगत नामदेव लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड, शान ए नांदेड, अन्नपूर्णा प्रेरणा रत्न पुरस्कार, कानडा राजा पंढरीचा राष्ट्रीय कृपा पुरस्कार, तिरंगा गौरव पुरस्कार, लॉयन्स बेस्ट प्रोजेक्ट इंटरनॅशनल अवार्ड, जय संताजी मानवता रक्षक पुरस्कार देऊन देशभरातील विविध संस्थातर्फे गौरविण्यात आले आहे. ॲड.दिलीपभाऊ ठाकूर यांना इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स कमिशन नॅशनल अवार्ड मिळाल्याबद्दल स्नेहलता जयस्वाल, कामाजी सरोदे, प्रवीण अवधिया, अरुणकुमार काबरा ,सुरेश निल्लावार,प्रशांत पळसकर, सुरेश शर्मा, अमोल कुल्थिया, सागर जैन, बिरबल यादव अंकुश पार्डीकर, आदित्य अश्टुरकर, धीरज स्वामी, राज यादव यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.