मातीच्या चार ट्रक पकडल्या - दंडात्मक कारवाई होणार
नविन नांदेड| जिल्हाधिकारी डॉ .विपीन ईटणकर यांनी काळी माती उपसा केलेल्या व परवानगी नसलेल्या पावत्या वर वेळ व दिनांक नसलेल्या चार हायवा ट्रक जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटणकर यांनी नांदेड लातूर रोडवरील विष्णुपुरी असरजन नाका येथे पकडुन मंडळ अधिकारी यांचा मार्फत पंचनामा करून नांदेड तहसीलदार यांच्या मार्फत दंडात्मक कारवाई व गुन्हा नोंदविण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे ट्रक लावण्यात आल्या असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे,या कार्यवाही मुळे मात्र खळबळ उडाली.
नांदेड लातूर रोडवरील विष्णुपुरी जवळील असरजन नाका येथे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पालम येथुन क्षमते पैक्षा जास्त प्रमाणात काळी माती असलेल्या हायवा ट्रक एम.एच.२६ बि.ई.२८०५ मालक शेख सनी शेख बाबु,एम .एच.२६ बि.आर.२७२८ शंकर सिताराम पांचाळ,एम.एच.२६ बि.ई.२५६६, गोविंदराव दतराम जाधव, एम.एच.२६ बि.ई.३००७, रवि केशव शिंदे यांच्या मालकाच्या ट्रक ५ सर्रास काळी माती घेऊन वाजेगावकडे भरधाव वेगाने येत असतांनाच अचानक जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटणकर यांनी गाड्या थांबवल्या व तपासणी केली. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील तहसीलदार यांच्या परवानगी असलेल्या पावत्या आढळल्या. पंरतु दिनांक व वेळ नमुद नसल्याने तात्काळ मंडळ अधिकारी के.एम.नागरवाड,भनगी तलाठी संभाजी घुगे,जुना कौठा तलाठी मनोज देवणे यांनी तात्काळ येऊन सदरील ट्रक ग्रामीण पोलीस स्टेशन नेण्यात आल्या.
यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिका-यांना मार्फत तपासणी केली असता या ट्रक मध्ये क्षेमता पैक्षा एक सर्रास काळी माती चार ही ट्रकमध्ये आढळून आली आहे. तर मंडळ अधिकारी नागरवाड यांनी पंचनामा करून दंडात्मक कारवाई साठी अहवाल तहसीलदार नांदेड किरण अंबेकर यांच्याकडे पाठवला असून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी ट्रक लावण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटणकर यांनी सकाळी केलेल्या कार्यवाही \मुळे अवैधरित्या उपसा करणा-या मध्ये खळबळ उडाली.