शेतकरी व बेरोजगार तरुणासाठी दिलासादायक अर्थसंकल्प - ॲड रेवण भोसले -NNL


उस्मानाबाद|
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या इतिहासात शेतीसाठी सर्वाधिक दोन लाख सत्तर हजार कोटीची तरतूद असलेला तसेच कोरोना संकटकाळात निर्माण झालेल्या बेरोजगारीने देशाच्या अर्थव्यवस्थेला पोखरले असल्यामुळे आत्मनिर्भर भारत अंतर्गत 16 लाख नोकऱ्या तर मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख नोकऱ्या देण्याचा संकल्प केला आहे.सहकार व खाजगी संस्था साठी आता वेगळा नियम नसून 15 टक्के कर राहणार आहे. हे अंदाजपत्रक 130 कोटी भारतीयांचे जीवनमान अधिक उंचावणारे आहे. 

तसेच यामध्ये महामार्ग, रेल्वे, वीज, आरोग्य, शिक्षण व शेतीशी संबंधित महत्वपूर्ण पायाभूत सुविधावर अधिक भर देण्यात आला आहे. शेतकरी, महिला व युवकाकडे अधिक लक्ष देणारे अंदाजपत्रकात पीएम  गती शक्ती योजनेच्या माध्यमातून विकासावर अधिक भर देण्यात आला आहे .सर्व सामान्य माणूस ,शेतकरी- कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने मांडला असल्याची प्रतिक्रिया जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी दिली आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी