सामाजिक कार्यकर्त्या सौ.दिपा गोवर्धन बियाणी यांची प्रमुख उपस्थिती
नांदेड| येथील वसंत नगर भागातील दुर्गा कॉलनी येथे दुर्गा कॉलनी दुर्गात्सवात पहील्या दिवशीची दुर्गादेवीची आरती उत्साहात पार पाडण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ.दिपा गोवर्धन बियाणी यांची प्रमुख उपस्थिती होती येथील नवदुर्गा दुर्गोत्सवाला ३५ वर्षाचा दैदीप्यमान इतिहास लाभला असून या ठिकाणी मागील ३५ वर्षापासून दुर्गा देवीची प्रतिष्ठापना मोठ्या भाविक भक्तीने आणि उत्साह पूर्ण वातावरणात करण्यात येते..
सदरील दुर्गादेवीचे वैशिष्ट्य म्हणजे नवसाला पावणारी दुर्गा म्हणून दुर्गा कॉलनीची दुर्गादेवी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे या दुर्गा महोत्सवात विविध उपक्रम देखावे तसेच मोठ्या भंडाऱ्याने या महोत्सवाची सांगता करण्यात येते
मागील ३५ वर्षापासून याठिकाणी अंखडितपणे दुर्गादेवीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येते, भक्तांमध्ये मोठा उत्साह असतो दुर्गा कॉलनीतील सर्व रहिवासी बांधव या उत्सवासाठी एकजुटीने काम करतात यावर्षीचे दुर्गा समितीचे अध्यक्ष म्हणून पुरुषांमध्ये विजय दासरवार तर उपाध्यक्ष म्हणून गजानन चिट्टमवार तर महिलांमध्ये श्रद्धा कदम यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून आशाताई इंगळे यांची निवड करण्यात आली असून उर्वरित कार्यकारणीत महिलांमध्ये कमल ताई केंद्रे, सरस्वती वाघ तर पुरुष कार्यकारणीत महेश दासरवार,आकाश यम्मेवार,अजय भालके,विनायक दासरवार,माधवसिंह ठाकूर,कैलास पाटील वाघ यांच्यासह गणेश यम्मेवार,ऋषिकेश दासरवार,विरेंद्र ठाकूर,सोनू वानखेडे,आकाश भोरे,श्रेयश अनंतरवार,संदिप ठाकूर,विनोद कल्याणकर,बापुराव वाघ,विक्की वाघ व नारायण चव्हाण यांचा समावेश आहे..