साढेतीन महिन्यापूर्वी झाला होता चिंचोर्डीच्या माजी तंटामुक्ती अध्यक्षाचा निर्घृण खून
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे चिंचोर्डी येथील माजी तंटामुक्ती अध्यक्षाचा अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने गळा आवळून खून केला होता. साढेतीन महिने उलटून गेले तरी त्या आरोपीचा शोध लागला नाही, त्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास हिमायतनगर पोलिसांकडून २५ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. एवढेच नाहीतर माहिती देणाऱ्याचे नावही गुप्त ठेवण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या खून घटनेची माहिती देऊन पोलिसाना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून केले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे चिंचोर्डी येथील मयत पांडुरंग मारोती वाघमारे वय ५० वर्ष यांचे शेत दऱ्याखोऱ्यातील जंगलाच्या कडेला असल्याने नेहमीच वन्यप्राण्यांचा त्रास असतो. त्यांच्या पासून शेतीचे रक्षण व्हावे यासाठी शेतकरी पत्नीसह शेतात राहत होते. दि.२९ ऑकटोबर २०२१ रोज शुक्रवारी सकाळी मयताची पत्नी घराकडे भाकरीसाठी आली असता तिकडे शेतकरी पांडुरंग वाघमारे हे जंगलात लाकडे आणण्यासाठी कुर्हाड घेऊन गेला होता. पत्नी जेंव्हा भाकर घेऊन शेतात गेली त्यावेळी मयत पांडुरंग शेतीत आढळून आले नाही. त्यानंतर त्यांनी फोन लावून पाहिला शेतकरी फोन उचलत नव्हते.
परत गावात येऊन फोन लावून चौकशी केली असता मयत पांडुरंग जंगलाच्या दिशेने गेले असल्याचे आढळले. शेताच्या काही अंतरावर दगडवाडी परिसरातील जंगलात टेकडीवर अंदाजे ३ किमी अंतरावर मयताचे प्रेत आढळून आले. पोलिसांनी पंचनामा केला असता अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने मारून त्यांची निर्घुर्ण हत्या केली होती. या खुनाच्या घटनेचा तपास पोलिसांनी सुरु केला अनेकांच्या जबानी घेऊन त्या दिशेनं तपास झाला. मात्र या घटनेस तीन ते साढेतीन महिन्याचा कालावधी लोटला मात्र मारेकऱ्यांचा शोध पोलिसांना लागला नाही सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे हे करत होते, त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने ते सुटीवर गेल्याने या घटनेचा तपास प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे करीत आहेत.
खून घटनेचा तपासासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली मात्र तपास लागत नसल्यामुळे हिमायतनगर पोलिसांनी सदर मयताच्या खुन प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जनतेनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. तसेच मयत माजी तंटामुक्त अध्यक्षाच्या खून करणाऱ्या मारेकऱ्याबद्दल माहिती देणाऱ्यास हिमायतनगर पोलिसांकडून रोख रक्कम २५०००/- (पंचवीस हजार रूपये) रोख बक्षीस देण्यात येईल असे जाहीर केले आहे. तसेच माहीती देणाऱ्याचे नाव गुपीत ठेवण्यात येईल असेही प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे. कोणत्याही नागरिकांना या खुनाबद्दल आणि आरोपीबद्दल काही माहिती असेल तर त्यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे पो.स्टे.हिमायतनगर, मो. ९५१८९४५०३ ३, ९९२३१९९८६१. हेमंत रामराव चोले पो.हे.कॉ.१९६९ पो.स्टे.हिमायतनगर मो.९७६५८८७१५० यांचेशी संपर्क साधावा असेही म्हंटले आहे.