हिमायतनगर| हिमायतनगर ते भोकर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पोटा बु. भागात असलेल्या अनेक धाब्यावर विना परवाना अवैध देशीदारूची खुलेआम विक्री केली जात आहे. दिवसभर चालू असलेल्या या दारू विक्रीमुळे मद्यपींच्या संख्येत मोठी वाढ होऊन गांवकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराकडे पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे पोटा परिसरातील नागरिकांच्या तोडून ऐकावयास मिळत आहेत.हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु. सोनारी भागात अनेक धाबे थाटल्या गेला आहेत. नव्याने राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे ये-जा करणारे अनेक प्रवाशी धाब्यावर जेवण करण्यासाठी थांबत असून, याच ठिकाणी अवैध रित्या देशी दारूची विक्री जोमात चालु असल्यामुळे पोटा, सोनारी परीसरातील अनेक नागरिक देखील दारूच्या आहारी गेले आहेत. परिणामी दिवसभर काबाडकष्ट करणारे आणि महामार्गाने ये - जा करणार्यां सहज दारू मिळत असल्याने अनेकांचे संसार उद्धवस्त होण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.
देशी दारुच्या आहारी सुशिक्षित वर्ग सुद्धा जाऊ लागल्याने रोज बायका लेकरांना मारहाण करणे दारु पिऊन रोड रोमीवो बनुन भांडण तंटा निर्माण करुन सामान्य माणसाला त्रास देणं हे प्रकार रावजाचा घडू लागले आहेत. याचा बरोबर ग्रामीण भागातही अवैध देशीदारु मिळत असल्याने हिमायतनगर तालुक्यात दारूचा धंद्याकडे अनेक बेरोजगार युअवक देखील वळत आहेत. कोणतेही काम न करता दारूचे दोन बॉक्स वीकले तरी ऐशो आरामात जीवन जगात येईल हा ध्यास युवा पिढीनेही वाम मार्गाला लावत आहे.
आता तर शासनाने किराणा दुकानातून दारूची विक्री करण्याचा निर्णय घेतल्याने अवैद्य रित्या दारूचा धंदा करणार्यांना यामुळे उलट अभय मिळाले आहे. हे प्रकार वाढून कायदा व सुव्यस्था बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणूक होणार आहेत. त्यामुळे आत्तापासून काही इकचुकानी मतदारांना दारूचे व्यसन लावण्यासाठी अवैद्य दारू विक्रेत्यांचे त्यांना पाठबळ मिळत आज. हा प्रकार थांबविण्यासाठी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हिमायतनगर - भोकर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या धाब्यावर व ग्रामीण परिसरात सुरु असलेले अवैध देशी दारूचे धंदे थांबवून वाम मार्गाला लागणाऱ्या पिढीला वाचवावे अशी मागणी केली जात आहे.
मागील काळात हिमायतनगर तालुक्यातील सोनारे फाट्यावरील दारू बंदीसाठी काढण्यात आलेली पत्रिका सर्वत्र गाजली. त्यानंतर बरेच गावांच्या ठिकाणी आणि पिता, सोनारी फाटा येथील दारूचे अवैध धंदे बंद करण्यात आले. यास कालावधी लोटला आणि नवीन पोलीस निरीक्षक हिमायतनगर ठाण्याला लाभले. त्यानंतर पुन्हा या भागातील दारू विक्रीचा गोरखधंदा जोमाने सुरु झाला असल्याचे दिसून येते आहे. हिमायतनगर पोलिसांना व उत्पादन शुल्क विभागाला अवैध दारू, जुगारासह इतर गैर धंद्याची माहिती नसेल का ? माहिती असेल तर अवैध धंदे करणार्यावर कार्यवाही का केली जात नाही..? कि अवैध धंदे करणाऱ्यांना राजकीय वरदहस्त असल्याने पोलिसांवर दबाव वाढलं का..? असे अनेक प्रश्न पोटा व सोनारी परिसरातील नागरिकांच्या मनात उद्भवत आहेत.