गुरु ग्रंथ साहिब सत्कार कमेटी पंजाब च्या वतीने बाबा बलबीर सिंह मुछल यांच्या नेतृत्वाखाली मोहीम सुरू
नांदेड। पंजाब व देश विदेशात विविध जेल मध्ये बंद असलेल्या कैद्यांची मुक्तता होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
गुरु ग्रंथ साहिब सत्कार कमेटी पंजाब च्या वतीने बाबा बलबीर सिंह मुछल यांच्या नेतृत्वाखाली एक जथा नुकताच श्री हुजूर साहिब नांदेड येथे आला होता. पंजाब अमृतसर व देश विदेशात विविध जेल मध्ये बंद असलेल्या कैद्यांची मुक्तता होण्यासाठी त्यांनी नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा मध्ये प्रार्थना (अरदास) केली. यावेळी भाई गुरनाम सिंह बटाला, सुखदेव सिंह, भाई जुगराज सिंह, प्रनाम सिंह, मेजर सिंह, सतनामसिंह, बलकार सिंह, मंगलजीत सिंह महाकाल, बाबा बलजीत सिंह निहंगसिंह यांच्या सह 150 जण सहभागी झाले होते.
"बाबा बलबीरसिंह मुछल" ने कहा कि "सियासी पार्टीयां बहुसंख्यक लोगों की वोट बटोरने के लिए कानून के उलट भी चले जाती हैं। कानून के मुताबिक तय सजा से ज्यादा समय तक जेलों में बंद रहने के बावजूद सिख कैदियों की रिहाई नहीं की जा रही"..
अमृतसर,पंजाब व देश विदेशात विविध जेल मध्ये विनाकारण अनेक शीख समुदाय मधील युवक जेल बंद आहेत, त्यांना सोडवण्यासाठी कोणतीही राजकीय पक्ष पुढे येत नाहीत, म्हणून गुरु ग्रंथ साहिब सत्कार कमेटी पंजाब अमृतसर च्या वतीने बाबा बलबीर सिंह मुछल यांच्या नेतृत्वाखाली हि मोहीम सुरू केली आहे, कैद्यांची मुक्तता होण्यासाठी निवेदन, गुरुजी यांच्या दरबारात नमस्कार,प्रार्थना करण्यात येत आहे.