सिडको हडको व जिजाऊ सृष्टी येथे शिवजन्मोत्सव पुर्वी पुतळा दिपोत्सव -NNL

नविन नांदेड। शिवजन्मोत्सवाचा पुर्व संध्येला सिडको परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात व जिजाऊ सृष्टी येथे दिपोत्सव १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता साजरा करण्यात आला,हा दिपोत्सव सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

शिवजयंती निमित्ताने सिडको परिसरातील शिवाजी चौक व हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात व जिजाऊ सृष्टी येथे शिवजन्मोत्सवाचा पुर्व संध्येला जिजाऊ ब्रिगेड व  विविध राजकीय पक्षांच्या महिला पदाधिकारी, परिसरातील महिलांच्या ऊपसिथीत दिपोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष  सौ. सरस्वती धोपटे,माजी नगरसेविका सौ .ललीता शिंदे, शिवसेना महिला आघाडीच्या निकीता शहापुरवाड, सिंधुताई देशमुख, विजया गोडघासे,पुष्पा उदय देशमुख, सिडको जिजाऊ ब्रिगेडच्या ज्योती पाटील, स्वाती मोरे,कमल हिवराळे, मणकरणा ताटे,प्रेमला सुर्यवंशी,मंगला हिवराळे,संगिता मोरे, उज्ज्वला चव्हाण,सुंगधा चव्हाण, कौसल्या कदम, अनुष्का पाटील, ज्योती कदम, स्वाती भरकड,  विमल बाई भरकड,प्रिया मोरे,सरोज देवसरकर, अश्विनी भरकड,आरती भरकड, सविता देवसरकर, लक्षमी कदम, सुरेखा माने,वर्षा पाटील, संध्या देशपांडे, संध्या पवार,शमशाद बेगम पठाण यांच्या सह  गुरूकृपा महिला भजनी मंडळ पदाधिकारी उपस्थित होते. 


शिवजयंती निमित्ताने पुतळा परिसरात सुशोभीकरण व विघुत रोषणाई यासह भगवे ध्वज लावण्यात आल्याने व दिपोत्सव मुळे परिसर उजळून गेला होता. या दिपोत्सव प्रसंगी भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे,युवा नेते उदय भाऊ देशमुख, सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्ये दिलीप कदम, साहेबराव गाढे,संग्राम मोरे, भि.ना. गायकवाड , वामनराव देवसरकर,दिपक भरकड, मुझोहीद पठाण यांच्या सह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी